गाव म्हटलं की, प्रगतीपासून काहीशा दुरावलेल्या भागाचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. अनेक गावांत तासन् तास वीज नसते, पक्के रस्तेही नसतात. सोयी-सुविधांचा अभाव खेड्यांत असतो. पण आम्ही तुम्हाला अशा गावाबदद्ल माहिती सांगणार आहोत जे जगातील सर्वात सधन गाव समजलं जातं. या गावातील प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत आहे. प्रत्येकाचं घर अद्यावत सोयीसुविधांनी सज्ज आहे.

वाचा : ही कंपनी पाणीपुरी व्यवसायात गुंतवणार चक्क १०० कोटी!

चीनमधल्या जियांगसू प्रातांत हे गाव आहे. हुवाक्सी असं या गावाचं नाव असून ते चीनमधलं श्रीमंत गाव आहे. या गावाला ‘सुपर व्हिलेज’ म्हणूनही ओळखलं जातं. शांघायपासून १३५ किलोमीटर दूर हे गाव आहे. या गावात अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. या गावाची आर्थिक परिस्थिती ही खूपच वाईट होती. काही वर्षांपूर्वी प्रगतीपासून हे गाव पूर्णपणे दुरावलं होतं. पण कम्युनिस्टांच्या काळात गावाच्या प्रगतीने वेग धरला. गावातील सगळेच लोक सामूहिक शेती करतात. उत्पन्नातून येणारा फायदा सगळे वाटून घेतात. हा पैसा कोणा एका व्यक्तीचा नसून तो संपूर्ण गावाचा आहे असं हे लोक मानतात. एवढंच नाही तर या गावातील सगळीच घर ही एकसारखी आहे. घरांचा रंग, रचना एवढी एकसारखी पाहायला मिळते की इथे एखादा नवखा आला तर तो नक्कीच चक्रावून जाईल.

वाचा : यंत्रमानवामुळे माणसं बेरोजगार होतील?; पाहा आनंद महिंद्रांनी काय उत्तर दिलं

‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार यागावातील प्रत्येक रस्त्यावर येथे राहणाऱ्या कुटुंबीयांचे फोटो लावण्यात आले आहेत. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या छोट्या मोठ्या गोष्टींची नोंद देखील ठेवली जाते. म्हणजे एका कुटुंबात किती सदस्य आहेत, त्यांच शिक्षण किती, त्यांच्या घरात गाड्या किती आहे, फ्रिज, टीव्ही, मोबाईल किती आहेत? या सगळ्यांची नोंद ठेवली जाते.