दिवाळी सण हा आता भारतापूरता मर्यादित न राहता तो ग्लोबल झाला आहे असे म्हटले तर जास्त चांगले ठरेल. आज कामानिमित्त अनेक भारतीय परदेशात स्थायिक झालेत, त्यामुळे तिथे स्थायिक झालेल्या भारतीयांनी आपल्या सणाची ही परंपरा तिथेही रुजवली आहे. यंदा खास दिवळीनिमित्त ऑस्ट्रेलियामधले प्रतिष्ठित असे सिडनी येथील ऑपेरा हाऊस देखील सोनेरी रंगात रंगवले जाणार आहे. येत्या २८ तारखेला ऑपेरा हाऊसचा रंग बदलण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री आठ वाजल्यापासून ऑपेरा हाऊस नव्या रंगा ढंगात पाहता येणार आहे. याआधी देखील ऑपेरा हाऊस सजवण्यात आले होते.

तर दुसरीकडे सिंगापूरमध्येही दिवाळीनिमित्त खास रौनक पाहता येणार आहे. सिंगापूरमध्ये दिवाळीसाठी दिवाळी थिम ट्रेन धावणार आहे. १५ ऑक्टोबरला या ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. या ट्रेनमध्ये ठिकठिकाणी रांगोळ्या, दिवे, तोरण, शुभ शकुनांचे स्टिकर्स चिटकवण्यात आले आहे. मास रॅपीड ट्रान्झीटने सिंगापूरमधल्या या पहिल्या वहिल्या दिवाळी ट्रेनचे अनावरण केले. तर इथल्या रस्ते वाहतूक विभागाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सजवलेल्या ट्रेनचे फोटो देखील शेअर केले. प्रत्येक ट्रेनच्या कोचमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देणारे संदेश देखील लावण्यात आले आहेत.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Raigad, Private bus caught fire,
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग
Night mega block of Central Railway for two days
Megablock Update: मध्य रेल्वेचा दोन दिवसीय रात्रकालीन ब्लॉक
Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष