रेल्वेचं जेवण हे सामान्य माणसाच्या खाण्यालायक नाही, असं कॅग म्हणजेच नियंत्रक व महालेखापालने सादर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. अनेकदा प्रवासी रेल्वेच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या खाण्याची आणि त्याच्या दर्जाची तक्रार करतात. आता कॅगनेही त्याला दुजोरा दिला आहे. रेल्वेमध्ये अशुद्ध, डब्बाबंद आणि निष्कृट दर्जाच्या साहित्याचा वापर जेवण तयार करण्यासाठी केला जातो. यातल्या डब्बाबंद पदार्थांची एक्सपायरी डेटही संपलेली असते असेही पदार्थ जेवण तयार करताना वापरले जात असल्याची पोलखोल कॅगने आपल्या रिपोर्टमध्ये केलीये.
रेल्वे आणि कॅगच्या टीमने एकूण ७४ रेल्वे स्थानक आणि ८० रेल्वेमध्ये परीक्षण केलं. यादरम्यान जेवण तयार करताना स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचं समोर आलंय. काही ठिकाणी तर रेल्वे किचनमध्ये अशुद्ध पाण्याचा वापर केला गेल्याचंही समोर आलंय.

किचनमधला कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कचरापेट्या या उघड्या असतात. झुरळ, कोळी, उंदीर यांचा वावर असतोच आणि त्यांच्यापासून पदार्थ सुरक्षित राहावे किंवा ते झाकून ठेवण्याइतपतही काळजी घेतली जात नसल्याचेही या अहवालातून उघड झालंय.

Viral Video : निसर्गाचा चमत्कार की आणखी काही?

Viral : व्हायरल होणारी ‘ही’ पाटी तुम्ही वाचलीत का?