भारतीय वैज्ञानिक मनिषा मोहन हिने असं उपकरण तयार केलंय की ज्यामुळे बलात्कार रोखता येणं शक्य होणार आहे. मनिषाने असा दावा केलाय की या उपकरणामुळे बलात्कार रोखता येतील आणि महिलांचा पाशवी अत्याचारापासून बचावही होईल. ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून मनिषा काम करत आहे. हे उपकरण कपड्यावर कुठेही सहज चिटकवता येतं. यामध्ये विशिष्ट सेन्सॉर असणार आहे. जर कोणी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर यातून पीडितेच्या घरी, कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना अलर्ट जाईल. त्याचप्रमाणे यातील अलार्ममुळे आजूबाजूला मोठा आवजाही ऐकू जाईल. त्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं जाईल आणि ते मदतीला धावून येतील अशी माहिती मनिषाने ‘पीटीआय’शी बोलताना दिली.

एका विशिष्ट परिस्थितीत हे उपकरण काम करणार आहे. या उपकरणात ‘अॅक्टीव्ह’ आणि ‘पॅसिव्ह’ असे दोन मोड असणार आहेत. जर कोणी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर पीडित महिला बटन दाबून आपल्या मित्र मैत्रिणींना आणि पोलिसांना अलर्ट पाठवू शकते. अॅक्टीव्ह मोडमध्ये हे शक्य होणार आहे. तर समजा पीडित महिला स्वत:हून अलर्ट पाठवू शकली नाही तर पॅसिव्ह मोडमध्ये हे उपकरण स्वत:हून आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अलर्ट तिच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवणार आहे असंही मनिषाने सांगितले.

indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान