निसर्गाने मानवाला भरभरून दिलंय. त्यामानाने मानवाने निसर्गाकडून खूप काही ओरबाडून घेतलंय. पृथ्वीवर राहणाऱ्या अनेक सजीवांपैकी एक असणारा मानव स्वत:च्या पृथ्वीचा अधिपती समजायला लागला. आपण जंगलं नष्ट केली, नद्या कोरड्याठाक केल्या, पशुपक्षी नामशेष केले. वातावरणाचा समतोल बिघडवला. हे सगळं करत असताना आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत आहोत याचं भानही मानवाला राहिलं नाही. गेल्या शतकभरात तर निसर्गाची न भरून निघणारी हानी झाली आहे. प्राणीपक्ष्यांच्या कितीतरी प्रजाती नष्ट झाल्या आहेत. त्यात दिवसेंदिवस भर पडतेय.

पशुपक्ष्यांच्या या प्रजाती नामशेष होण्याला आळा घालण्यासाठी व्यापक स्वरूपच्या उपाययोजना करणं आवश्यक तर आहेच. पण त्याचबरोबर कोणत्याही मुक्या जिवाचा हकनाक बळी जाऊ नये यासाठीही प्रयत्न होणं आवश्यक आहे.

वाहनांच्या धडकांमुळे प्राण्यांचा मृत्यू झाल्याची अनेक बातम्या आपण एेकत असतो. आता जंगलात राहणारे हे प्राणी या रस्त्यांवर येतातच कशाला असा प्रश्न तुम्हाआम्हा मर्त्य मानवांना पडतो पण विकास करण्याच्या नादात आपण सर्वांनी प्राण्यांच्या प्रदेशात आक्रमण करत तिथे रस्ते बांधले आहेत याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. प्राणी तर त्यांच्या घरातच असतात आपला रस्ताच अध्येमध्ये कडमडतो. ‘हे सगळं होणारच’ वगैरे म्हणत आपण या समस्येकडे दुर्लक्ष करू पाहतो. पण यावर अनेक देशांमध्ये उपाय शोधले गेले आहेत हे बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतं. जगातल्या अनेक देशांमध्ये अनेक ठिकाणी मानवनिर्मित रस्ते जंगलातून गेले आहेत त्याठिकाणी प्राण्यांना रस्ता ‘क्राॅस’ करण्यासाठी ‘ब्रिज’ बांधले आहेत. हे ब्रिजसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण रीतीने बांधले आहेत. कसे आणि कुठे ते पहा,

१. जर्मनी

जर्मनी (छाया सौजन्य- गूगल)

छाया सौजन्य- गूगल

२.सिंगापूर

छाया सौजन्य- गूगल
छाया सौजन्य- गूगल

 

३. खेकड्यांसाठी बांधलेला आॅस्ट्रेलियामधला वैशिष्ट्यपूर्ण ब्रिज

छाया सौजन्य-गूगल
छाया सौजन्य-गूगल

 

जगात अनेक ठिकाणी असे वैशिष्ट्यपूर्ण ब्रिज बांधले गेले आहेत. तर काही ठिकाणी प्राण्यांसाठी खास अंडरपास किंवा सबवे बनवण्यात आले आहेत.

केनिया

छाया सौजन्य- गूगल
छाया सौजन्य- गूगल

 

हे ब्रिजेस् किंवा अंडरपासेस बनवताना ते कसेही बनवण्यात आलेले नाहीत. तर या प्रदेशात होणारा प्राण्यांचा होणारा वावर, त्यांच्या होणाऱ्या हालचाली लक्षात घेत हे बनवण्यात आले आहे.

यासारख्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवायला फार काही करावं लागत नाही हो. फक्त मुक्या प्राण्यांविषयी काहीतरी करण्याची आस आणि त्याला दिलेली कल्पनाशक्तीची जोड याने अशा साध्यासुध्या पण पर्यावरणाला मदतकारक गोष्टी करता येतात.