घर आणि संसार यामध्ये अनेक जोडपी इतकी अडकून जातात की त्यांना स्वत:साठी आणि भटकण्यासाठी वेळच मिळत नाही. मात्र या अडचणींवर अमेरिकेतील जस्टीन आणि बेटसी वुड्स या दांपत्याने एक हटके उपाय शोधला आहे. त्यांनी गाडीतच आपला संसार थाटला आहे. याच निर्णयामुळे ते आता एका चालत्या फिरत्या घराचे मालक आहेत.

अमेरिकेतील अनेक ठिकाणी भटकण्याची या दोघांची सुरुवातीपासूनच इच्छा होती. त्यामुळेच घर घेणे किंवा घरभाडे भरणे या गोष्टींचा खर्च त्यांना वायफळ वाटत होता. दोघांनी यावर चर्चा करून अखेर एका पांढऱ्या रंगाच्या व्हॅनलाच आपले घर बनवले. या घरासाठी त्यांना खर्च आला तो फक्त तीन लाख रुपये. पण या तीन लाखांमध्ये त्यांनी त्या गाडीमध्ये अगदी ओव्हनपासून बेडरुमपर्यंत सर्व सोयीसुविधांचा समावेश करुन घेतला आहे.

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

सध्या या गाडीमधून २८ वर्षीय जस्टीन आणि २६ वर्षीय बेटसी अमेरिका भ्रमंतीवर आहे. ते आपल्या प्रवासाचे अनुभव ब्लॉगवरून जगभरातील लोकांपर्यंत पोहचवत असून त्यांचा ब्लॉग पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. मेडीकल क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या या दोघांच्या मते काम करुन, गाडीत राहून जगाची सफर करणे सहज शक्य आहे. या जोडप्याने आत्तापर्यंत केलेल्या सहली अनेकांना ट्रॅव्हल गोल्स देत असल्याचे त्यांच्या ब्लॉगवरील कमेन्टवरून दिसते. हे असे ‘रस्त्यावरचे आयुष्य’ जगणाऱ्या वुड्स दांपत्याच्या कोणी प्रेमात पडले नाही तरच नवल.