वैविध्यतेने नटलेला आपला भारत देश जिथे कोणे एके काळी सोन्याच्या धूर निघायचा. ज्या देशाला हजारो वर्षांची संस्कृती, इतिहास आहे , जिथे विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात असा देश जगाच्या पाठीवर क्वचितच आढळेल. खरं तर भारताबद्दल सांगायच्या झाल्या तर शेकडो गोष्टी आहेत, ज्या  तुम्हाला माहिती नसतील. चला तर मग अशा  भारताबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

* भारताचे पहिले रॉकेट सायकलवरून वाहून नेण्यात आले होते. तर उपग्रह चक्क बैलगाडीवरून वाहून आणण्यात आला होता.
* हिऱ्यांच्या उत्पादनात भारत आशियामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातली हिऱ्याची बाजारपेठही मोठी आहे.
* भारतातल्या आश्चर्यांपैकी एक असलेला प्रसिद्ध ताजमहाल हा कुतुबमिनारपेक्षाही उंच आहे बरं का! कुतुबमिनार हा जगातला सगळ्यात उंच मिनार आहे. ताजमहालाची उंची २४३ फूट आहे तर तर कुतूब मिनारची उंची २३९ फूट आहे.
* जगातील सगळ्यात मोठी शाळा भारतात आहे. लखनौमधली सिटी माँटेसरी हायस्कूल ही जगातली सगळ्यात मोठी शाळा असून यात ३९ हजारांहून अधिक विद्यार्थी शिकतात तर २५०० शिक्षक शिकवतात. या शाळेची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे.
*  जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे लोक भारतात राहतात. जगात अमेरिकेनंतर सर्वाधिक इंग्रजी ही भारतात बोलली जाते.

msrtc buses, Scrapped msrtc buses, Maharashtra ST Corporation, Scrapped buses, no data msrtc, good buses, bad buses, out of order buses, rti, maharashtra st, maharshtra buses, marathi news, maharashtra news,
धक्कादायक! ‘एसटी’कडे चांगल्या, नादुरुस्त बसेसची माहितीच नाही!
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व

* जगाच्या तुलनेत भारतात शाकाहारी लोकांचे प्रमाण अधिक आहे. अनेक धर्मांत मांसाहार वर्ज्य आहे त्यामुळे जगात शाकाहारी सर्वाधिक प्रमाणात भारतात मोठ्या संख्येने आढळतात.
* भारतात इतर युरोपीय देशांच्या तुलनेत दुधाचे उत्पादन अधिक घेतले जाते.
* अब्दुल कलाम यांनी २००६ स्वित्झर्लंड भेट दिली होती. तेव्हा त्यांच्या नावे स्वित्झर्लंडमध्ये विज्ञान दिवस साजरा केला जातो.
* २०११ मध्ये झालेल्या कुंभ मेळ्यासाठी लाखो भाविकांचा सागर उसळला होता जो अवकाशातूनही नजरेस पडत होता.
* जगाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वाधिक टपाल कार्यालये आहेत. भारतात दीड लाखांहूनही अधिक टपाल कार्यालये आहेत. तर दल लेकमध्ये तरंगते टपाल कार्यालयदेखील आहे.