”गौर से देखो इस चेहरे को! तमाम दर्शको के बीच मे बैठा ये वही चेहरा है जिसके वजहासे, मुंबई इंडियन्स एक रनसे जित गयी. ये वही चेहरा है जिसके वजाहसे पुणे केवल १ रनसे हार गयी. कहते है बुढो की, बच्चो की भगवान जल्दी सुन लेता है… आयपीएल की फायनल मैच में पुणे की टीमने मैच लगबघ जीत ही लिया था… पर इस बुढी औरत की दुवा रंग लायी और मुंबईने हारा हुआ मैच जीत लिया…” या आजींना पाहून एव्हाना सगळ्याच सोशल मीडियावर या गोष्टीची चर्चा सुरू आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या mumbai indians यशाचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एक आजी होत्या. आता तुम्हालाही उत्सुकता असेल की, या आजी नेमक्या कोण होत्या ते.

तर या आजी आहेत मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी यांच्या आई पूर्णिमाबेन दलाल. मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना पाहण्यासाठी त्या आल्या होत्या. मुंबई इंडियन्सची सुरूवात खूप वाईट झाली होती. मुंबई इंडियन्स काही सामना जिंकत नाही, असं सगळ्यांना वाटतं होतं, पण नंतर पारडं मुंबईच्या बाजूनं झुकू लागलं. पण शेवटच्या षटकात सामन्याने पुन्हा एकदा रंग बदलला आणि अटीतटीची स्पर्धा सुरू झाली. आता हा सामना मुंबईने जिंकावा, यासाठी कोणी एवढ्या प्रार्थना केल्या नसतील तेवढ्या या आजींनी केल्या. शेवटच्या षटकात आजी अक्षरश: डोळे बंद करून देवाचा धावा करत होत्या, हे त्यांच्याकडे नुसतं बघून कोणीही सांगू शकेल. आता पूर्णिमाबेनचं एवढं क्रिकेटप्रेम कॅमेराच्या नजरेतून सुटलं नसेल तरच नवल. पण शेवटी आजींच्या प्रार्थनेला देव धावून आला आणि पुण्याच्या हातून मुंबईने विजय खेचून आणला. मुंबईच्या विजयाचे श्रेय तस बघायला गेलं तर रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्त्वाखालील टीमला जातं. पण या मागे कोणाच्या प्रार्थना कामी आल्या असतील, तर त्या निश्चितच अंबानींच्या आईच्या! अहो हे आम्ही बोलत नाही तर खुद्द चाहत्यांनी ट्विट सांगितलंय. आता तुम्हीच बघा मुंबई इंडियन्सचे फॅन काय म्हणतात ते..