सोशल मीडियावर फोटो शेअर करणे हे काही आपल्यासाठी नवे नाही. काही जण असेही आहेत जे दिवसाला एक दोन नाही तर चक्क १० – १२ फोटो देखील सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यातून ती व्यक्ती एखादी सेलिब्रिटी असेल तर विचारायलाच नको. त्यांच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती असते त्यामुळे सेलिब्रिटी असो की खेळाडू त्यांचे सोशल मीडियावर अनेक फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातून खेळाडू असला की जिममधला किंवा सराव करतानाचा फोटो तो टाकणारच पण इराणच्या महिला शरीरसौष्ठवपटूला मात्र असे करणे महागात पडले आहे. इराणमधली महिला शरीरसौष्ठवपटूने आपले जीममधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पण इस्लामच्या दृष्टीने ते फोटो आक्षेपार्ह असल्याने तिला तुरुंगासाची शिक्षा झाली.

वाचा : बांगलादेशी तरुणींच्या मनावर राज्य करतो ‘हा’ तरूण

इराणमधील महिला शरीरसौष्ठवपटू जिचे नाव शिरीन नोबाहरी असे समजत आहे. तिने जीममधले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. अनेक खेळाडू आपले असे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात यात काही नवल नाही. पण इराणच्या कायद्याप्रमाणे महिलांनी हिजाब न घालता फोटो टाकणे हे गुन्हा आहेत त्यातून पाय, हाताचे दंड दाखवणारे फोटो हे इराणच्या इस्लामिक कायद्याप्रमाणे नग्न प्रकारत मोडतात. त्यामुळे तिने टाकलेले हे फोटो गुन्हा असल्याचे सांगत तिला अटक करण्यात आली. दंडाची रक्कम भरुन तिला जामिन मिळाला असता पण रक्कम भरण्याएवढे पैसे नसल्याने तिला तुरुंगात राहावे लागले. शिरीन  हिचे इन्स्टाग्रामवर जवळपास ६७ हजार फॉलोअर्स आहेत. तिने बायसेप्स दाखवतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला होता. हा फोटो नग्न असल्याचा ठपका ठेवत तिला तुरुंगवास ठोठावला. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियात देखील असाच प्रकार घडला होता. या महिलेने कॅफेच्या बाहेर पाश्चिमात्त्य पेहरावातील फोटो शेअर केला होता. तिने इस्लामचा कायदा मोडला म्हणून तिला देखील तुरूंगास झाला होता.

वाचा : मुलगा गुगलमध्ये इंजिनिअर, तर वडील गावात करतात मोलमजुरी