गरमागरम, कुरकुरीत, चटपटीत समोसा आणि त्यासोबत तिखट पुदीन्याची चटणी खाण्याची मजाच काही वेगळी. भारतीयांचे सगळ्यात आवडते स्नॅक. थंडी असो की पावसाळा किंवा छोटी पार्टी यात वेगवेगळ्या चवीचे समोसे नसले तर काहीतरी चुकल्यासारखे वाटते. त्यामुळे भारताच्या कोप-या कोप-यात पोहचलेला या समोस्यावर एखाद्या देशाने बंदी घातली तर ?

Viral : पत्नीचा वाढदिवस विसरणे ‘येथे’ कायद्याने गुन्हा

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ

तुम्हालाही आश्चर्य वाटेल की समोस्यासारख्या पदार्थावर कोण का बंदी घालेल? पण जगात एक असा देश आहे जिथे समोसा खाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सोमालिया या देशात समोसा खाण्यावर पूर्णपणे बंदी आहे. भारत तसेच आफ्रिकामध्ये विविध प्रकारचे सारण वापरून हा त्रिकोणी आकाराचा पदार्थ बनवला जातो. या समोस्याच्या आकाराचा ख्रिश्चन धर्माशी संबध जोडून त्यावर सोमालियात बंदी घालण्यात आली आहे. सोमालियच्या अल शबाब या कट्टर इस्लामिक संघटनेने ही बंदी घातली आहे. अल शबाब ही संघटना क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. तालिबान या संघटनेशी अल शबाब या संघटनेचा संबध जोडला जातो. २०११ मध्ये या संघटनेच्या दहशतवाद्यांनी लाउडस्पीकरचा वापर करून सोमालियात समोस्यावर बंदी घालण्याचा निर्णय जाहिर केला. ‘डेली मेल’ या इंग्रजी साईट्वर देखील या संबधीचे वृत्त झळकले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी सोशल मीडियावर हे वृत्त चर्चिले गेले.

सोमालियामध्ये ‘सांबुसास’ या नावाने समोसा ओळखला जातो. समोस्याचा आकार त्रिकोणी असतो. ख्रिश्चन धर्मात त्रिकोणी आकार पवित्र मानला जातो. त्यामुळे त्रिकोण हा ‘होली ट्रिनिटी’चे प्रतिक आहे. इश्वराची तीन रुपे असतात असे या धर्मात मानले जाते. म्हणूनच, समोस्यावर या देशात बंदी घालण्यात आली आहे. याआधीही या देशात वेगवेगळ्या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. फूटबॉलचे सामने पाहणे आणि खेळणे, तसेच तंग कपडे घालणे यासारख्या अनेक गोष्टींवर या देशात बंदी आहे.