सिग्नल तोडू नका, वाहनं झेब्रा क्रॉसच्या अलिकडेच उभी करा, गाडी चालवताना सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करा, असे साधे-साधे वाहतुकीचे नियम आहेत. पण हे नियम पाळतोय कोण? नियम हे मोडण्यासाठी असतात असं म्हणत आपण सर्रास हे नियम पायदळी तुडवतो. पण ते आपल्या सुरक्षेसाठीच तर असतात ना! मग ते पाळण्यासाठी आपल्याला सक्ती का करावी लागते? आणि हे पटवून देण्यासाठी जयपूर वाहतूक पोलिसांनी झक्कास शक्कल लढवली आहे. ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Viral : ‘I have boyfriend’ म्हणणाऱ्या मुलींनो जरा हा व्हिडिओ पाहाच!

रेड सिग्नल असल्यास वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेच ठेवा. पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष द्या’ अशी कॅप्शन लिहून जयपूर वाहतूक पोलिसांनी एक ‘मिम’ शेअर केलाय. ज्यात एका बाजूला झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेच गाड्या उभ्या आहेत तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहाचा ‘तो’ घातकी नो बॉल दाखवण्यात आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बुमराहने ती लक्ष्मणरेखा ओलांडली आणि हीच एक चूक भारतीय क्रिकेट संघाला महागात पडली, हे वेगळं सागण्याची गरज नाही. त्या नो बॉलवर पाकिस्तानचा फलंदाज झमन झेलबाद झाला होता. पण नो बॉल असल्यानं त्याला पुन्हा संधी मिळाली आणि त्यानं शतक ठोकलं. त्याच्या १११ धावांच्या खेळीमुळं पाकिस्तानला धावांचा डोंगर उभारता आला. बुमराहने केलेल्या त्या चुकीची किंमत भारतीय संघाला मोजावी लागली. तर बुमराहनं क्रिकेटच्या मैदानावर जशी चूक केली तीच आपण रस्त्यावर वाहन चालवताना केली तर त्याची किती मोठी किंमत मोजावी लागेल याची जरा कल्पना करा, असा सूचक संदेश जयपूरच्या वाहतूक पोलिसांनी चालकांना दिलाय. तेव्हा जयपूर पोलिसांच्या या ‘डोकॅलिटी’चे आणि त्यातून त्यांनी चालकांना दिलेल्या संदेशाचे सध्या सोशल मीडियावर खूपच कौतुक होतंय!

Viral Video : अपघात पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल