रस्त्यावरून जाताना, मंडईत, मासळी बाजारात आपल्याला अनेक भटक्या मांजरी दिसतात. त्यावेळी आपल्या मनात या मांजरी काय खातात? कशा जगतात? कुठे राहतात?, असा तात्पुरता विचार येतो. मात्र, त्या ठिकाणाहून निघाल्यानंतर आपल्याला या मांजरींशी फारसे देणेघेणे नसते. अर्थात काही कट्टर प्राणीप्रेमी याला अपवाद असतात. मात्र, जपानमध्ये अशा भटक्या मांजरीविषयी जनजागृती करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय. येथील एका स्वयंसेवी संस्थेने योरो रेल्वे कॉ-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या मदतीने रेल्वेमध्ये ‘कॅट कॅफे’ सुरु केला आहे.

चोरांना उपरती, २ दिवसांनी चोरीचा माल परत करत घरमालकालाच दिला लाखमोलाचा सल्ला

त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना जपानी लोकांना आता मांजराची सोबत मिळणार आहे. जवळपास तीस एक मांजरांना रेल्वेच्या डब्यात ठेवण्यात आलं आहे. या मांजरी डब्यात मुक्तपणे संचार करतात, तर कधी प्रवाशांच्या बाजूला येऊन बसतात. प्रवाशी या मांजरांसोबत खेळू शकतात, त्यांना खाद्यपदार्थही भरवू शकतात. जपानमध्ये भटक्या मांजरींची संख्या ही वाढत आहे. पूर्वी अनेक जण या मांजरींना दत्तक घ्यायेच. पण आता हे प्रमाण तुलनेत घटले आहे. सध्याच्या घडीला जपानमध्ये ९० लाखांहून अधिक भटक्या मांजरी आहेत. त्यांच्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलाय.

अनेक जण मला पुरुष म्हणून हिणवायचे; टेनिस सम्राज्ञी सेरेनाचे आईला भावनिक पत्र