अनेकदा आपलं आपल्या सोबत राहणाऱ्या माणसांशी नीट पटत नाही तिथे आपण प्राण्यांशी जुळवून कुठून घेणार. त्यांच्या राज्यात मैत्रीचं असं नातं नसतंच म्हणा. काही मोजके प्राणी सोडले तर कोणतेच प्राणी माणसांशी आणि माणूस त्यांच्याशी जुळवून घेऊ शकत नाही हेही तितकंच खरं. पण काही माणसं याला अपवाद असतात आणि ते यांच्याशी जुळवून घेतातच. जपानचे हिरोयुको हे अशा वेगळ्या लोकांपैकी एक. ते स्कुबा डायव्हार आहेत, काही वर्षांपूर्वी खोल समुद्रात डायव्हिंग करताना त्यांना एक जखमी मासा दिसला होता. त्याने या माशाला किनाऱ्यावर आणलं. दहा दिवस ते या माशाची काळजी घेत होते. त्यानंतर हिरोयुको यांनी या माशाला पुन्हा समुद्रात सोडून दिलं.

३२ वर्षांनंतर ‘मायक्रोसॉफ्ट पेंट’ घेणार निरोप

त्यानंतर जेव्हा ते परत डायव्हिंग करायला गेले तेव्हा त्यांना हा मासा दिसला. या माशाने त्यांना कसं ओळखंलं हे हिरोयुकोच काय पण कोणालाचं कळलं नाही. पण जेव्हा जेव्हा हिरोयुको डायव्हिंग करण्यासाठी जातात तेव्हा हा मासा त्यांना भेटण्यासाठी येतोच. अनेकदा तो खोल समुद्रातही त्यांच्या सोबतच असतो. या माशाने हिरोयुकोंचा चेहरा कसा लक्षात ठेवला याचं उत्तर कोणालाच मिळालं नाही, पण गेल्या २५ वर्षांपासून या दोघांची मैत्री कायम आहे. ते स्वत: ७६ वर्षांचे आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आपल्या मित्राला भेटायला जातात. अनेकदा डॉल्फिन माशाची माणसांची गट्टी होते हे आपण ऐकले असेल पण असा प्रकार आपण फारच क्वचित पाहिला असेल.

‘हा’ माणूस वर्षाचे सहा महिने विमानात राहतो