आपण बऱ्याचदा यू-ट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ पाहतो. त्यातले काही आपल्याला खूप जास्त आवडतात. त्यामुळे आपण ते पुन्हा-पुन्हा पाहतो तर काही अजिबातच न आवडल्याने थोडेसे पाहून सोडून देतो. काही व्हिडिओ तर इतके बोगस असतात की, आपल्याला ते का तयार केले, असा प्रश्न पडतो. आता सामान्य व्हिडिओच्या बाबतीत हे झाले तर ठीक आहे. पण कोणत्या सेलिब्रिटींच्या व्हिडिओच्या बाबतीत जर असे घडले तर? प्रसिद्ध गायक जस्टीन बिबरचा यु-ट्यूबवर अपलोड केलेल्या एका गाण्याचा व्हिडिओ याच प्रकारामुळे चर्चेत आला आहे. त्याचे ‘बेबी’ हे गाणे अनेकांनी यू-ट्यूबवर अनेकांनी डिसलाईक केले आहे.

बीबरचे हे गाणे १७२ करोड जणांनी पाहिले आहे. तर ७० लाखांहून अनेकांनी त्याचा या गाण्याचा व्हिडिओ लाईक केला आहे. मात्र, धक्कादायक गोष्ट म्हणजे ८० लाखांहून जास्त जणांनी तो व्हिडिओ अनलाईक केला आहे. यानंतर नेटकऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न आवडणारं गाणं आहे, रेबेका ब्लॅक यांचे ‘फ्रायडे’. ६ लाख ७० हजार लोकांनी हे गाणे लाईक केले आहे तर २५ लाख ७९ हजार जणांनी या गाण्याचा व्हिडिओ डिसलाईक केला आहे. आता यामागचे नेमके कारण काय हे शोधणे अवघड आहे. पण श्रोत्यांनी या गाण्याला नापसंती दिली आहे हे नक्की.

याआधी दक्षिण कोरियाचा पॉप सिंगर सायने गायलेल्या ‘गंगनम स्टाईल’ या गाण्याने जगाला वेड लावलं होतं. तो नेमकं काय गातोय, त्याचे बोल काय हे कोरियन भाषा जाणणाऱ्या लोकांना सोडून कोणालाच कळतं नव्हते. तरीही हा व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यामुळेच गेल्या साडेचार वर्षांपासून यू-ट्युबच्या सर्वाधिक वेळा पाहिल्या गेलेल्या म्हणजेच मोस्ट वॉचच्या यादीत हा व्हिडिओ पहिल्या स्थानावर होता. पण आता हा व्हिडिओ मोस्ट वॉचच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.