फास्ट फूडच्या गुणवत्तेविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्नचिन्ह असतं. हे पदार्थ कुठे बनतात? ते बनत असताना किती स्वच्छता पाळली जाते किंवा स्वच्छता पाळली तरी जाते का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात घोळत असतात. पण हे सगळं कधी, हे पदार्थ आपण खात नसताना. एरव्ही गरमागरम रगडा पॅटिस, पाणीपुरी, भुर्जी, किंवा पराठा समोर आल्यावर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फरक पडत नाही. चमचमीत खाणं समोर आल्यावर आपल्याला सगळ्याचा विसर पडतो. आणि त्या खाण्याच्या नादात आपण बाकी काही लक्षात घेत नाही.आणि एकदम या सगळ्या गोष्टी समोर आल्या की गहजब होतो.

दिल्लीच्या एका फेमस हाॅटेलबाबत असंच झालं. ‘काके-दा-हाॅटेल’ या  हाॅटेलच्या छतावर या हाॅटेलचा एक कर्मचारी पायाने पीठ मळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता . पहा हा व्हिडिओ.

सौजन्य-ट्विटर

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर साहजिकच सगळीकडे खळबळ माजली. या व्हिडिओमध्ये दिसणारा प्रकार अनेक हाॅटेल्समध्ये होतो असं आपण एेकून असतो पण असं प्रत्यक्ष व्हिडिओत दिसल्याने तसंच चक्का काके-दा-हाॅटेलमध्ये हा प्रकार चालत असल्याचं दिसल्याने आणखीनच चर्चा सुरू झाली.

व्हिडिओ: हाॅटेलमध्ये शिरली भली मोठी पाल!

पण आता हा माणूस पायाने पीठ मळत नसल्याचं समोर आलंय. या हाॅटेलमालकाशी संपर्क साधल्यावर हाॅटेलचा हा कर्मचारी या पातेल्यात कपडे धूत असल्याचं समोर आलंय. या भल्यामोठ्या पातेल्याच्या वापर फक्त कपडे धुण्यासाठी होत असल्याचंही या हाॅटेलमालकाने सांगितलं. हा व्हिडिओ ज्या व्यक्तीने ट्विटरवर टाकला त्या व्यक्तीलाही या व्हिडिओमधला माणूस नक्की काय करतोय याची कल्पना नव्हती. ‘मला हा व्हिडिओ व्हाॅट्सअॅपवर आला’ असं या व्यक्तीने सांगितलं.

आपल्याला  फाॅरवर्ड होऊन आलेले अशा व्हिडिओज् ची कोणतीही शहानिशा न करता ते तसेच्या तसे पुढे पाठवल्यामुळे अफवा कशा पसरू शकतात याचं हे  मोठं उदाहरण आहे.