तुम्हाला विशिष्ट भाषा येत नसेल तर तुम्हाला तुमच्या नोकरीवर पाणी सोडावे लागू शकते. ‘कर्नाटका विकास प्राधिकरण’ने बँकेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येत्या ६ महिन्यात कानडी शिका नाहीतर नोकरी सोडा अशा स्वरुपाची धमकीवजा नोटीस दिली आहे. कानडी बोलू न शकणाऱ्या प्रादेशिक प्रमुखांना हे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकमधील राष्ट्रीय, खासगी आणि ग्रामिण अशा सर्व बँकांमध्ये हे आदेश देण्यात आले आहेत.

बँकेचे दैनंदिन व्यवहार स्थानिक भाषेमध्ये होणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणनाने यावेळी स्पष्ट केले. अशाप्रकारे स्थानिक भाषेचा वापर केल्यास जास्तीत जास्त लोक बँक सेवेचा लाभ घेऊ शकतील. विशेषतः ग्रामिण भागात भाषेची समस्या भेडसावत असल्याने बँकेतील अधिकाऱ्यांना कानडी येणे क्रमप्राप्त आहे असेही स्पष्ट केले. वर्षाच्या सुरुवातीला एक ग्राहकाने चेकवर कानडीमध्ये माहिती लिहीली होती आणि त्याचा चेक नाकारण्यात आला. यावरुन हा ग्राहक बॅंकेविरोधात न्यायालयात गेला होता.

pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका

कर्नाटका विकास प्राधिकरण अशाप्रकारे भाषेवरुन आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढू शकते का याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरीही दक्षिण भागातील बँकांनी हे निर्देश गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. याबाबत सोशल मीडियावरही जोरदार मोहिम सुरु असून ट्विटरवर ‘अवर बँक निड कानडा’ अशा आशयाचे मेसेज टाकण्यात येत आहेत. अर्थिक क्षेत्रात स्थानिक भाषेचा वापर वाढावा हा यामागील मुख्य उद्देश आहे.
एटीएमचे तसेच बँकांचे व्यवहार कानडी भाषेत नसून ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये असल्याबाबत अनेक नागरीकांनी राग व्यक्त केला आहे. यामध्ये अनेकांनी एटीएमचे होमपेज, बँकेचे फोटो, बँकेची इंग्रजी भाषेत मिळणारी सुविधा असे फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये स्थानिक भाषेचा पर्याय उपलब्ध नसल्याची खंत अनेकांनी मांडली आहे. त्यामुळे बँकांचे सर्व व्यवहार कानडीमध्ये असावेत यासाठी कर्नाटका विकास प्राधिकरणाने हे निर्देश दिले आहेत. याशिवाय हे व्यवहार हिंदी आणि इंग्रजीतही कायम राहणार असल्याचे या निर्देशात म्हटले आहे.