राजे महाराजे, राजाचा महाल यासा-या गोष्टी आता इतिहासात जमा झाल्यात. इतिहासाची पान चाळताना या राजा राण्यांविषयी कितीतरी गोष्टी, दंतकथा आपल्याला वाचायला मिळतात. ‘राजाचा आलिशान महाल होता’, ‘राजा फार दानशूर होता’, ‘जनतेला माणिक मोती’, ‘सोन्याची नाणी वाटायचा’ वगैरे वगैरे . त्यातून राजघराण्यात एखादा कार्यक्रम असला तर विचारायलाच नको. महलापासून राज्यातील सारे रस्ते अगदी नववधूसारखे सजवले जायचे. नाना चवीचे शाही भोजन असायचे, सा-या राज्याला मेजवानी असायची शिवाय जनतेला उदार राजा भेटवस्तू वाटायचा ते वेगळंच. असे राजेशाही सोहळे आता कुठे पाहायला मिळतात म्हणा? हल्ली ब्रिटनच्या राणीचा ९० वा वाढदिवस साजरा झाला तेव्हा हे सारे पाहायला मिळाले होते पण अपवाद वगळता सामान्य माणासांना काही राजासाबोत मेजवानी करण्याचे सुख नाही.

वाचा : स्वच्छ भारतअंर्तगत बांधलेल्या शौचालयाचे गावक-याने बनवले स्वयंपाक घर

वाचा : उकळत्या तेलात ‘तो’ चक्क हातांनी तळतो भजी

पण नेदरलँडचे नागरिक मात्र याबाबतीत सुखीच म्हणावे लागेल. इथल्या राजांच्या २७ एप्रिलला ५० वा वाढदिवस आहे आणि वाढदिवासनिमित्त १५० नागरिकांना राजासोबत शाही भोजनाचा आनंद घेता येणार आहे. हा आता हे १५० नागरिक कोणीही असू शकतात बुवा.! तुम्ही आम्ही किंवा आणखी कोणी. किंग व्हिल्यम अलेक्सझँडर यांचा ५० वा वाढदिवस आहे आणि या समारंभात सामान्य जनतेला देखील सहभागी होता यावे यासाठी त्यांनी खास एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेसबसाईटवर लॉगिन करून आपल्या नावाची नोंदणी करायची. यापैकी १५० भाग्यशाली नागरिकांना राजासोबत महालात वाढदिवस साजरा करता येणार आहे. ‘१५० खुर्च्या तुमच्यासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. मी आणि माझी पत्नी तुमची आतुरतेने वाट बघत आहोत’ असेही राजाने लिहिले आहे. एवढंच नाही तर २७ एप्रिलला सार्वजनिक सुट्टीच राजाने घोषीत केली आहे. त्यामुळे राजाचा वाढदिवस दणक्यात होणार यात शंका नाही.