डोक्यावरील केस हा तसा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. ज्यांना नैसर्गिकरित्या दाट केसांचं देणं लाभलं आहे, ते तर खरे भाग्यवान. उत्तम केशरचनेमुळे व्यक्तिमत्व आकर्षक दिसण्यास मदत होते. आपले केस चांगले दिसावे आणि वाढत्या वयाबरोबर ते टिकून राहावेत यासाठी अनेकजण विविध केश पोषक द्रव्ये आणि प्रसाधनांचा वापर करताना दिसतात. तर काहीजण सरळ, मुलायम अथवा कुरळे केस करण्याच्या प्रयत्नात असल्याचेदेखील पाहायला मिळते. त्याचबरोबर केशरचनेतसुध्दा वैविध्यता आणण्याचे प्रयत्न केले जातात. इंटरनेटच्या महाजालावर फेरफटका मारल्यास आकर्षक केशरचनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहायला मिळतीलं. केशरचना कशी साकारावी याची माहितीदेखील काही ठिकाणी पुरविण्यात आलेली असते.

सर्वसामान्य विचाराला बगल देत निराळा विचार करणारे अनेकजण समाजात आढळून येतात. त्यामुळेच अशा व्यक्तींचे वेगळेपण उठून दिसते आणि त्यांची दखल घेण्यास भाग पडते. केवळ ढोबळमानाने आकर्षक दिसणारी केशरचना न साकारता आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावेल, अशी केशरचना एक तरुणी साकारते. विविध केशरचनेतील या तरुणीची छायाचित्रे सध्या इंटरनेटवर व्हयरल होत आहेत. Laetitia KY नावाची ही तरुणी केसांच शिल्प साकारते, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २१ वर्षांची ही तरुण फॅशन डिझायनर असून, डोक्यावरील केसांना नवनवीन आकार देत अनोखी केशरचनेतील स्वत:ची आकर्षक छायाचित्रं खास करून इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

आत्तापर्यंत तिने नाचणारी मुलगी, झाड, विविध हस्तमुद्रा, कॅप, गॉगलसह विविध शिल्प डोक्यावरील केसांमधून साकारली आहेत. जे तिच्या हेअरस्टाईलचे वेगळेपण ठरते. तिच्या दाट कुरळ्या केसांची तिला या विविध केशरचना साकारण्यात मदत होते. त्याचबरोबर डोक्यावरील केसांच्या शिल्पाला आधार मिळावा आणि आपल्याला हवे ते शिल्प साकारता यावे यासाठी ती केसांमध्ये वायरचा वापरदेखील करते. अशा या Laetitia KY चे जगभरात अनेक चाहते असून दिवसागणिक तिच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.

आफ्रिकन स्त्रिया आणि कृष्णवर्णियांच्या विविध केशरचना दर्शविणाऱ्या ‘ब्युटी आणि कॉम्प्लेक्सिटी’ नावाच्या छायाचित्रांच्या मालिकेतून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे तिने ‘बझफीड’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. केवळ एकाच गोष्टीतून नव्हे तर विविध गोष्टीतून आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचेदेखील ती म्हणाली.

पाहा Laetitia KY ने साकारलेली ‘केश शिल्पे’ –

A post shared by KY (@laetitiaky) on

A post shared by KY (@laetitiaky) on

A post shared by KY (@laetitiaky) on

A post shared by KY (@laetitiaky) on

A post shared by KY (@laetitiaky) on

A post shared by KY (@laetitiaky) on

A post shared by KY (@laetitiaky) on

A post shared by KY (@laetitiaky) on

A post shared by KY (@laetitiaky) on

अशाच आणि यासारख्या अनोख्या बातम्यांसाठी पुढील लिंकवर क्लिक करून लोकसत्ताच्या फेसबुक पेजला आजचं लाईक करा. https://www.facebook.com/LoksattaLive

लायटीटीआच्या केश शिल्पांबाबत तुम्हाला काय वाटते ते खालील ‘कमेंट बॉक्स’मध्ये अवश्य नोंदवा.