लहानपणी जादूचे खेळ पाहताना आपल्याला किती उत्सुकता असायची ना! हा कसा बरा जादू करत असेल? असे एक ना दोन शंभर प्रश्न विचारून आपण आई बाबांना वेडं करून सोडलं असेल. अनेकांना तर हे जादूचे खेळ पाहून मोठेपणी जादूगारच व्हायचं असंही वाटलं असेल. ही जादू आपल्याला आली तर किती छान होईल! असेही विचार अनेकदा मनात आले असतीलच. या जादूगाराविषयी किती आकर्षण वाटलं असेल नाही का?

viral video : बंदुकीतून सुटलेली गोळी तोंडात पकडण्याचा स्टंट जादुगाराच्या जीवावर बेतला

वाचा : ही मुघल राजकन्या आता झोपडपट्टीत राहते!

पण जस जसे मोठे होत गेलो तसे या जादूगराविषयी फारसं आकर्षण आपल्याला राहिलं नाही. हा काही जादू वगैरे करत नाही हे आपल्याला कळून चुकलं. हे जादूचे प्रकार नसून हातचलाखी असल्याचे आपल्यालाही कळू लागलं पण असं असलं तरी ती जादू कशी करतात याचं कुतूहल मात्र अजूनही क्षमलं नाही. जर याविषयी तुम्हालाही कुतूहल असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पाहा. बेबी फर्स्ट टीव्ही या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हडिओ शेअर करण्यात आला आहे. जादूच्या सोप्या ४ ट्रिक्स यात शिकवल्या आहेत. आता या शिकून तुम्ही नक्कीच आपल्या मित्र मैत्रिणींना इम्प्रेंस करू शकता. किंवा लहान मुलांचे मनोरंज करु शकता, तेवढंच काही वेळासाठी का होईना जादूगार झाल्याचे समाधान.