एकमेकांपासून लांब असलेले, फारच क्वचितच भेटणारे, समान- भिन्न विचारांचे जगभरात राहणारे लोक फेसबुकमुळे एकमेकांशी जोडले गेलेत. आज आपलं फेसबुकशिवाय पानच हलतं नाही, फेसबुक वापरणारे सर्वाधिक युजर्स भारतात आहेत. या सोशल मीडिया साईटवर सतत सक्रीय असलेल्या युजर्सना वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न फेसबुकने केला आहे. आता खास भारतीय युजर्ससाठी फेसबुक नवे फिचर्स आणणार आहे. या फिचरचं नाव आहे ‘लोकल कॅमेरा इफेफ्ट’. फेसबुकवर फोटो अपलोड करताना तुम्हाला वेगवेगळ्या फोटो फ्रेम्स आणि इफेक्ट दिसतात. पण फेसबुकने आणलेले हे फिचर फक्त भारतीयांसाठी आहे. त्यामुळे  भारतीय युजर्स आपल्या भौगलिक प्रदेशानुसार आपल्या प्रोफाइल्स फ्रेम्स वापरू शकतात. विशेष म्हणजे मुंबई, दिल्ली शहरांसाठी आणि गोव्यासाठी  फेसबुकने हटके फ्रेम्स तयार केल्या आहेत. तेव्हा दिल्लीवाले, मुंबईकर आणि गोवेकर आपापल्या शहर, राज्यांप्रमाणे फेम्स वापरू शकतात. अर्वरित भारतीयांसाठी काही कॉमन फ्रेम्सही तयार करण्यात आल्या आहेत. उर्वरित भारतीयांसाठी काही कॉमन फ्रेम्सही तयार करण्यात आल्या आहेत. फेसबुक अॅप आणि मेसेंजर या दोन्ही ठिकाणी हे फिचर उपलब्ध असणार आहे.

तसेच फेसबुक लाइट युजर्ससाठी लाईकबरोबर आता ‘ रिअॅक्शन’चे बटन देखील दिले आहे. भारतात इंटरनेटचा स्पीड अपेक्षेप्रमाणे वेगवान नाही किंवा काही ठिकाणी नेटवर्कचीही अडचण येते. तेव्हा भारतीय युजर्ससाठी फेसबुकने ‘फेसबुक लाइट’ अॅप लाँच केले होते. या फेसबुक लाइट वापरणाऱ्या युजर्ससाठी लाइकबरोबर  रिअॅक्शनचा पर्यायही दिला आहे. फेसबुकच्या रिअॅक्शन बटणला युजर्सची खूप चांगली पसंती मिळाली होती. त्याचप्रमाणे फेसबुकवर असलेल्या ग्रुपवर देखील फेसबुक अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे फेसबुकचे प्रोडक्ट मॅनेजर अदित वैद्य यांनी एका वेबसाइटला सांगितले. समान विचारांचे किंवा एकसारखी आवड- छंद जोपासणारे, एकमेकांना मदत करणारे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे ग्रुप मोठ्या प्रमाणात फेसबुकवर सक्रीय असतात. तेव्हा त्या त्या ग्रुपमध्ये त्याच क्षेत्रातल्या व्यक्ती सहभागी कशा होतील यावर आम्ही अधिक काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समजा एका होतकरू शिक्षकांचा ग्रुप फेसबुकवर असेल तर त्या ग्रुपमध्ये फक्त देशभरातील होतकरू शिक्षक कसे एकत्र येतील एकमेकांना ते मदतीचे तसेच ज्ञानाचे आदानप्रदात कसे करतील, यावरही आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत असे अदित म्हणाले. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला एखादा छंद असेल तर समान छंद असलेल्या किंवा त्याक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी तो ग्रुप्समार्फत कसा जोडला जाईल यावरही फेसबुक विचार करत आहे.