निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात शिकणाऱ्या समृद्धी उमेश पुरोहित या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत. तिला या परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळाले असून तिने एक नवा विक्रम केला आहे. समृद्धीने विद्यालयात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पाहिला क्रमांक मिळविला आहे.

समृद्धीला लेखी परीक्षेत 491 गुण मिळाले असून 9 गुण कला विषयाचे मिळाले आहेत. 100 टक्के गुण मिळाल्याने तिचे आई वडील,नातेवाईक,मित्र मैत्रिणी आणि शाळेकडून कौतुक तिचे खूप कौतुक होत आहे. तर विद्यालायच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा पाटील यांनीही तिचे कौतुक करत शाबासकी दिली आहे.

मी चांगल्या गुणांनी पास होईन हे माहित होते मात्र ९८ ते ९९ टक्के गुण मिळतील असं वाटलं होतं. परंतु मला १०० टक्के गुण मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. याचं श्रेय आई वडील आणि शिक्षकांना आहे. इंटरनेटचा आधार घेत आणि आणखी काही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत अभ्यास करत राहील्याचे तिने यावेळी सांगितले. अभ्यास करताना मी कोणतेही दडपण घेतले नाही. मिळेल त्या वेळेत चांगला अभ्यास करत होते असे तिने सांगितले.

पुढे ती म्हणाली भविष्यात शास्त्रज्ञ होण्याचे माझे स्वप्न आहे. तर मेहनत करत अभ्यासावर भर द्यावा आणि किती गुण मिळतात याकडे लक्ष न देता अभ्यास करावा असे आवाहन तिने विद्यार्थ्यांना केले आहे.