आपल्या कुत्र्याला कांगारूने पकडून ठेवले म्हणून एका तरुणाने चक्क या कांगारुच्या तोंडावरच ठोसा लगावला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. शिकारी कुत्र्याला जंगलातले कांगारून सोडत नव्हते, त्यामुळे या माणसाने धावत जाऊन कांगारुच्या तोंडावर जोरदार ठोसा लगावला आणि आपल्या कुत्र्याची सुटका करुन घेतली.

VIDEO : घोरपडीच्या सुटकेचा थरार रेकॉर्ड करायला कॅमेरामनला लागली दोन वर्षे

ऑस्ट्रेलियातल्या एका जंगलातील व्हिडिओ आहे. ग्रेग टॉन्किंस नावाचा तरूण आपल्या काही शिकारी कुत्र्यांना घेऊन जंगली डुकराची शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. हे कुत्रे जंगली डुकराचा माग काढत होते. पण नेमका याच वेळी या ठिकाणी कांगारु आला. आणि कुत्र्याने आपल्यावर हल्ला करून नये यासाठी त्याला आपल्या तावडीत घड्ड पकडून ठेवले. कुत्र्याच्या मानेभोवती या कांगारुने आपली पकड घटट् केली होती. त्यामुळे आपल्या कुत्र्याला सोडवण्यासाठी या तरुणाने चक्क कांगारूच्या चेह-यावर ठोसा लागावला. या माराने कांगारू काहिसे बिथरले आणि कुत्र्यावरची त्याची पकड सैल झाली. याचाच फायदा घेत या तरुणाने आपल्या कुत्र्याला सोडवून घेत तिथून पळ काढला. मारामुळे कांगारूही जंगलात पळून गेले.

गेल्याच आठवड्यात हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. आतापर्यंत २ कोटींहूनही अधिक लोकांनी तो पाहिला. दरम्यान ही घटना जून महिन्याची असून ऑस्‍ट्रेलियातल्या न्‍यू साउथवेल्‍स भागात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणांवर अनेक प्राणीप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्याला धमक्याही आल्या असल्याचे समजत आहे. कांगारू हा ऑस्ट्रेलिआचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यामुळे त्याला अशा वाईट पद्धतीने मारल्यामुळे अनेकांनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण आपल्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी तेव्हा मला जे सुचले ते मी केले अशी बाजू ग्रेगने मांडली आहे.

  वाचा : स्केटिंग रिंग बनवण्यासाठी ५ हजार माशांना गोठवले