कोळ्याच्या जाळ्यात एकदा का एखादा कीटक अडकला की त्याच्यासाठी सुटकेचे सारे मार्ग बंद झालेच समजा. तिथून जिवंत परतणे नाहीच. अशा या कावेबाज आणि घात लावून शिकार करणाऱ्या कीटकाला पकडणं काही साधी गोष्ट नाही, त्याच्या जाळ्यात अडकलेले भलेभले शिकारीसुद्धा त्याची शिकार होतात. अशा कोळ्याला पकडण्याचा शहाणपणा नव्हे अतिशहाणपणा एकाने केला, पण हा अतिशहाणपणा त्याला भलताच नडला.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहताना कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल किंवा पाहून धडकी तरी भरेल. छतावर बसलेल्या एका मोठ्या कोळ्याला पकडण्याचा प्रयत्न एक तरूण करत होता तर त्याचा दुसरा मित्र गंमत म्हणून याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. हातात एक भांडं घेऊन त्याने छतावर असलेल्या कोळ्याला पकडलं आणि ते भांडं घेऊन खाली उतरला. कोळ्याला आपल्या जाळ्यात पकडल्याचा केवढा आनंद त्याला झाला, पण जसे त्याने या भांड्यात डोकावून पाहिले तेव्हा मात्र त्यालाच काय मित्रालाही धक्का बसला. कारण त्यांनी पकडलेला भलामोठा कोळी त्या भांड्यात नव्हताच..आता तो नक्की गेला कुठे हे पाहण्यासाठी मात्र तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल.