आपल्या शेजा-यांना घाबरवण्यासाठी एकाने चक्क काळे कपडे घातलेला मानवी सांगडा आकाशात उडवला. घरावर मानवी सांगाडा उडताना पाहून मात्र शेजा-यांना चांगलाच घाम फुटला. आकाशात उडणा-या या भूताचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अमेरिकेत राहणा-या तरुणाने गंमत म्हणून हे फोटो ट्विटरवर शेअर केले पण अल्पावधीतच त्याचे हे फोटो लाखो लोकांनी रिट्विट देखील केले. ३१ ऑक्टोबरला अनेक युरोपीयन देशांत हॅलोवीन नाईट साजरी केली जाते. या दिवशी मृत आत्मे पृथ्वीवर येतात अशी या लोकांची मान्यता आहे. यादिवशी भूताचा वेश धारण करून अनेक लोक रस्त्यावर फिरून एकमेकांना घाबरवतात. हॅलोवीन नाईटला आठवडा असला तरी सगळीकडेच हॅलोवीन माहोल तयार झाला आहे, म्हणूनच आपल्या शेज-यांना घाबरवण्यासाठी अमेरिकेतल्या मायकल अर्वन यांनी ड्रोन कॅमेराला मानवी सांगाडा बांधला. ड्रोन लपला जावा यासाठी त्यावर काळे कपडे देखील घातले आणि हा सांगाडा रिमोट कंट्रोलच्या साह्याने शेजा-यांच्या घरावर उडवला. आकाशात भूत उडत आहे हे पाहून शेजारी मात्र चांगलेच घाबरले, पण नंतर आपण मस्करी करत असल्याचे त्यांनी कबुल केले. मायकल यांच्या पुतण्याने हे फोटो इंटरनेटवर टाकले आणि लगेचच ते सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
complainant get back rs 3 5 lakh duped by online fraud with the help of kashimira police
वसई: ऑनलाईन फसवणुकीतील सव्वा तीन लाख रुपये मिळवून दिले, काशिमिरा पोलिसांनी तत्पर कारवाई