भारताच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक दिग्गजांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या. पण यात सगळ्यात विशेष ठरल्या त्या ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनने दिलेल्या शुभेच्छा! मॅथ्यूने राष्ट्रगीताचा फार सुंदर पद्धतीनं इंग्रजीत अनुवाद केला आणि तमाम भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

सचिन तेंडुलकर, विराट कोहली, शिखर धवन, वीरेंद्र सेहवाग या सगळ्यांनी ट्विट करत भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमध्येही अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, अमिताभ बच्चन यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यासगळ्या शुभेच्छा संदेशांमधून मॅथ्यूनं दिलेल्या शुभेच्छा हटके ठरल्या. ‘जन- गण- मन’ राष्ट्रगीताचा इंग्रजीत अनुवाद करत खूपच सुंदर अशी भेट त्याने भारतीयांना दिली. अनेकांनी मॅथ्यूच्या या सुंदर अनुवादाचं कौतुकही केलं आहे. त्यामागची मॅथ्यूची प्रामाणिक भावना सगळ्यांनाच भावली. तेव्हा मॅथ्यूनं राष्ट्रगीताचा केलेला हा अनुवाद अगदी जशाचा तसा..

May the ruler of the hearts of all people,
Dispenser of India’s fortune.
Whose name rouses the hearts of the Punjab, Sindh,
Gujarat, and Maratha,
Of the Dravida, and Odisha and Bengal.
Whose name echoes in the Himalayas
Whoe name mingles in the music of the
Yamuna and Ganga
And whose name is chanted by
the waves of the Indian sea
‘May He bless you and protect you.
May He smile on you and be gracious to you.
May he show you his favour and give you his peace.