अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा या जोडीचं प्रत्येक अमेरिकन जनेतच्या मनात एक वेगळंच स्थान आहे. आदर्श जोडप्याची व्याख्या या दोघांनी अमेरिकन जनतेच्या मनात बिंबवली. त्यांच्या कारकिर्दीत व्हाइट हाऊस हे सर्वसमावेशकता, वैविध्य व शांततेचे प्रतीक होऊ शकते असे वाटायला या दोघांनी वाव दिला. कठीण काळात किंवा अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये मिशेल, बराक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. या जोडप्याने नुकतीच आपल्या सहजीवनाची २५ वर्षे पूर्ण केली.

३ ऑक्टोबर १९९२ मध्ये हे दोघंही विवाहबंधनात अडकले. मिशेल यांनी हार्वर्ड लॉ स्कुलमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. १९८८ मध्ये सिडली ऑस्टिन लॉ फर्ममध्ये त्या नोकरी करू लागल्या आणि तिथेच त्यांची भेट बराक ओबामा यांच्याशी झाली. मिशेलना त्यांची मेंटोर म्हणून नेमण्यात आले. मिशेलच्या व्यक्तिमत्त्वाने बराक प्रभावित झाले होते आणि त्यांनंतर त्यांनी ‘डेट’साठी विचारले. पुढे याचे प्रेमात रुपांतर झाले.

वाचा : अवतीभोवती अनेक कलाकारांची मांदियाळी; ‘हा’ मुलगा आहे तरी कोण?

ओबामांच्या प्रवासात मिशेल यांचा वाटा मोलाचा होता. ओबामांनी राष्ट्राध्यक्षाच्या काळात जी काही आरोग्यविषयक धोरणे व कार्यक्रम आखले त्याची अंमलबजावणी अधिक चांगल्या प्रकारे कशी होईल हे मिशेल ओबामांनी पाहिले. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त मिशेल यांनी आपला जुना फोटो शेअर केला आहे. ‘ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणखी काही वर्षांनंतरदेखील तू माझा चांगला मित्र राहशील. मी ओळखत असलेलं तू सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्त्व आहे ‘ असं लिहित मिशेल यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Viral Video : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ कृतीने पुन्हा नेटिझन्स भडकले!

मिशेल यांनी शुभेच्छा दिल्यानंतर ओबामांनीदेखील आपल्या फेसबुक पेजवरून मिशेलसाठी एक भावपूर्ण संदेश दिला आहे. याची व्हिडिओ क्लिप त्यांनी  फेसबुकवर अपलोड केली आहे.