आईच्या मायेला काही तोड नाही. आपल्या मुलांवरच्या प्रेमापोटी आई काहीही करायला तयार होते. वेळप्रसंगी आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी आई आपला जीव धोक्यात घालायलाही मागे पुढे पाहात नाही आणि हेच अनुभवायला मिळालं सिडनी रेल्वे स्टेशनवर.

एक महिला आपल्या तीन मुलांना घेऊन सिडनी स्टेशनवर उभी होती. तिच्यासोबत तिचं काही महिन्यांचं मूलंही होतं जे बाबागाडीत शांत झोपलं होतं. ट्रेन यायला दीड एक मिनिटांचा अवधी होता. स्टेशनवर बऱ्यापैकी गर्दी होती. आईच्या किंचितशा दुर्लक्षामुळे बाबागाडी प्लॅटफॉर्मवरून घरंगळत गेली आणि गाडीत असणारं बाळंही रेल्वे ट्रॅकमध्ये जाऊन पडलं. ट्रेन कोणत्याही क्षणी स्टेशनवर येणार होती. एवढ्यात आई खाली उतरली आणि तिनं आपल्या बाळाला वाचवलं. ती प्लॅटफॉर्मवर बाळाला घेऊन सुखरुप चढल्यानंतर काही सेकंदातच प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली. ती आणि तिचं बाळ थोडक्यात बचावलं. ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : पती फोन उचलत नाही म्हणून ‘ती’नं मुलाला गळफास लावला