अल्पावधीत आपल्या सेवेने जवळपास १० कोटी ग्राहकांना रिलायन्स जिओने भुरळ घालली. ३१ मार्च पर्यंत जिओने आपल्या सर्व ग्राहकांना मोफत इंटरनेट सेवा दिली. त्यामुळे सर्वाधिक मोबाईल डेटा वापर होणारी जिओ जगातील पहिली कंपनी बनल्याची माहिती रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली आहे. ३१ मार्च नंतर आता जिओची मोफत इंटरनेट सेवा बंद होणार असून नवे दर काय असतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. आता १ एप्रिलपासून या मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ९९ रुपये भरावे लागणार आहे. रिलायन्सने प्राईम मेंबरशिप देऊ केली असून या सेवाचा लाभ घेण्यासाठी ९९ रुपयांची वार्षिक मेंबरशिप रिलायन्सने देऊ केली. पण त्याचबरोबर दर महिन्याला ३०३ रुपयांचे देखील रिचार्ज करावा लागणार आहे.

वाचा : ३१ मार्चपर्यंतच ‘जिओ’, मोफत इंटरनेट सेवा होणार बंद: मुकेश अंबानी

66364 crore collection through new 185 schemes of mutual funds
म्युच्युअल फंडांचे नवीन १८५ योजनांद्वारे ६६,३६४ कोटींचे संकलन
Vodafone Idea (VIL) , FPO, public investors
‘व्होडा-आयडिया’ची सुकाणू गुंतवणूकदारांकडून ५,४०० कोटींची निधी उभारणी, आजपासून प्रत्येकी १०-११ रुपयांनी समभाग विक्री
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती

रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मंगळवारी जिओच्या वाटचालीची माहिती दिली. अवघ्या १७० दिवसांमध्ये रिलायन्स जिओने १० कोटी ग्राहकांचा पल्ला गाठला. प्रति सेकंदाला सात ग्राहक जिओच्या सेवेशी जोडले जात आहेत असे मुकेश अंबानी यांनी सांगितले. जिओचे ग्राहक प्रति महिना १०० कोटी जीबीपेक्षा जास्त डाटा वापरतात. प्रति दिवसा ३.३ कोटी जीबी ऐवढे इंटरनेट वापरले जाते अशी आकडेवारीही त्यांनी जाहीर केली.