25 September 2017

News Flash

पोलीस दलातील ‘हा’ सिंघम समाजसेवेवर खर्च करतो पगारातील ४० टक्के रक्कम

ते २००६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 11:00 AM

शिवदीप लांडे हे २००६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. आयपीएस झाल्यावर शिवदीप लांडे यांनी महाराष्ट्रऐवजी बिहार कॅडर निवडला आणि ते बिहार पोलीस दलात रुजू झाले.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे हे पोलीस दलातील ‘सिंघम’ म्हणून ओळखले जातात. मुळचे अकोल्याचे असलेले लांडे यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. आपल्या पगारातील जवळपास ३० ते ४० टक्के रक्कम ते समाजसेवेसाठी खर्च करतात असं ‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’ने म्हटलं आहे. लग्नापूर्वी आपल्या पगारातील अर्ध्याहून अधिक रक्कम ते समाजसेवेसाठी दान करायचे पण लग्नानंतर आर्थिक जबाबदारीचं ओझं वाढल्यावर ते शक्य असेल तितके पैसे समाजसेवेसाठी दान करतात.

वाचा : अजब गजब! ‘या’ सणाला पुरलेल्या प्रेतांना बाहेर काढतात

शिवदीप लांडे यांची एक वेगळी ओळख बिहारमध्ये आहे. शिवदीप लांडे हे २००६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. आयपीएस झाल्यावर शिवदीप लांडे यांनी महाराष्ट्रऐवजी बिहार कॅडर निवडला आणि ते बिहार पोलीस दलात रुजू झाले. बिहारमध्ये रुजू झाल्यावर कमी काळातच त्यांनी त्यांच्या कामाने छाप पाडली. बिहारमधील गुंडांवर लांडे यांनी धडक कारवाई करत त्यावर चाप लावला. लांडे यांची पहिलीच नियुक्ती मुंगेर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त जमालपूरमध्ये झाली होती. या भागात लांडे यांनी स्थानिकांचा विश्वास संपादन करुन नक्षलवाद्यांना आव्हान दिले. अररिया येथे बदली झाल्यावर लांडेंनी रोडरोमिओंना धडा शिकवला. स्थानिक महिला आणि तरुणी लांडे यांना मेसेज करुन छेडछाडी विरोधात तक्रार करु लागल्या आणि हीच लांडे यांच्या कामाची पोचपावती होती. इथल्या मगध महिला कॉलेजच्या विद्यार्थीनींना गुंडाचा त्रास व्हायचा. हे गुंड मुलींना फोन करून त्रास द्यायचे. तेव्हा या मुलांना मोठ्या युक्तीने पकडून त्यांना चांगलीच उद्दल घडवली. शिवदीप लांडे हे राज्यातील जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत.

वाचा : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टीकेचे धनी, एका हातात नात दुसऱ्या हातात बिअर ग्लास

First Published on September 13, 2017 11:00 am

Web Title: mumbai head of narcotics department shivdeep lande donates almost half his salary to charity
टॅग IPS Shivdeep Lande
 1. U
  Ulhas
  Sep 13, 2017 at 12:36 pm
  टेरिफीक. लांडे ह्यांना सिंघम म्हणायच्या ऐवजी सिंघ ा शिवदीप म्हणायला हवे.
  Reply
  1. A
   Amol Devarkar
   Sep 13, 2017 at 12:14 pm
   खूप सुंदर शिवदीप.
   Reply
   1. V
    Vijay
    Sep 13, 2017 at 12:01 pm
    अकोल्याचे असलेले लांडे यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला, शिवदीप लांडे हे राज्यातील जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत आणि समाजसेवेवर खर्च करतो पगारातील ४० टक्के रक्कम. बस बस बस कळले आम्हाला किती मोठा समाजसेवी आहे ते अशे किती तरी गरीब समाजसेवी सध्या १०००-२००० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
    Reply