अॅपल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आयओएसवर आता नवीन व्हॉट्सअॅप अपडेट उपलब्ध होणार आहे. कारण अॅपलच्या फोनमध्ये असणारी ‘सिरी’ ही व्हॉईस असिस्टंट सिस्टिम आता व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेज देखील युजर्सना वाचून दाखवणार आहे.

अॅपलच्या सगळ्यात स्मार्ट उपकरणांमध्ये ‘सिरी’ ही व्हॉईस असिस्टंट सिस्टिम आहे. आपण ‘सिरी’ला आपल्या आवाजात सूचना देऊन त्याच्या मदतीने अनेक गोष्टी करू शकतो. आता हा सिरी व्हॉट्सअॅपवरचे मेसेज वाचून दाखवायला देखील मदत करणार आहे. “Hey Siri, read new WhatsApp messages.” अशी सूचना केल्यानंतर अॅपलच्या फोनवर आलेले मेसेज तो वाचून दाखवणार आहे. iOS १०.३ वर हे नवीन अपडेट उपलब्ध होणार आहे. आयफोनच्या सिरीमध्ये जाऊन ‘turn on support for WhatsApp’ वर क्लिक केल्यास हे फिचर अपडेट करता येते.

व्हॉट्सअॅपवर येणारा मेसेज सिरी वाचून दाखवू शकतो पण त्याचबरोबर तुमच्यावतीने तो रिप्लायही देऊ शकतो. तुमच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये असलेल्या नव्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या एखाद्या व्यक्तीला देखील सिरी रिप्लाय देऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही एखादे काम करण्यात व्यग्र असाल किंवा गाडी चालवत असाल तर सिरीच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवर लगेच रिप्लाय देऊ शकता.