आतापर्यंत गडगंज श्रीमंतांकडे दिसणा-या आलिशान आणि महागड्या अशा बीएमडब्ल्यू गाड्या लवकरच सामान्य माणासांच्या सेवेसाठी येणार आहे. ओला आणि बीएमडब्ल्यूने एकत्रित येऊन यासंदर्भातील घोषणा केली आहे, त्यामुळे आता बीएमडब्ल्यू टॅक्सीच्या रुपात रस्त्यावरून धावणार आहे. तेव्हा सामान्य माणूस या टॅक्सीरुपी आलिशान गाडीत बसून प्रवासाचा आनंद लुटू शकतो. २२ रुपये प्रतिकिलोमीटर अशा दराने ही गाडी आता ग्राहकांसाठी ओलाच्या अॅपवर लवकरच उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या चालकांना या गाड्या चालवण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी स्वस्त दरात कर्जही उपलब्ध करुन देण्याची सोय आता ओला करणार आहे.
सुरुवातीला मुंबई, दिल्ली आणि बंगळूरु या प्रमुख शहरांमध्ये या टॅक्सीरुपी बीएमडब्ल्यू धावणार आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यात जवळपास एक हजार बीएमडब्ल्यू गाड्या या रस्त्यावर उतरवण्याचा मानस आहे. बीएमडब्ल्यू या आलीशान गाडीत बसण्याचे स्वप्न अनेकांचे असते आणि सामान्य माणासाचे हेच स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने बीएमडब्ल्यू आणि ओलाने हा पुढाकार घेतला आहे.