‘रेल्वे रुळ ओलांडू नका, पूलचा वापर करा’ अशा सूचना वारंवार ऐकूनही आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. अनेक रेल्वे अपघात हे रुळ ओलांडल्याने होतात, दररोज कित्येक जणांचा जीव यामुळे जातो. उत्तर प्रदेशमधल्या उरई स्टेशनवर अशी घटना होता होता टळली. रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पिता पुत्रांच्या अंगावरून मालगाडी गेली पण प्रसंगावधानता दाखवत हे दोघंही दोन रुळांच्यामध्ये झोपून राहिले, त्यामुळे मालगाडी त्यांच्या अंगावरून गेली खरी पण दोघांना मात्र इजा झाली नाही. म्हणतात ना दैव तारी त्याला कोण मारी तसंच यांच्या बाबतीतही झालं आणि या अपघातातून ते दोघंही सुखरूप बचावले.

वाचा : नक्की वाचा मार्क झकरबर्ग आणि प्रिसिलाची ‘टॉयलेट एक प्रेमकथा’

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Three more flamingo deaths in nerul Demand for inquiry
आणखी तीन फ्लेमिंगोचा मृत्यू… नैसर्गिक की हत्या? चौकशीची मागणी 
( Accident near Ambajogai Waghala Pati in Beed )
अपघातात नियोजित नवरदेवासह बहीण, भाची ठार; मृत रेणापूरजवळचे, अंबाजोगाईनजीकची दुर्घटना
Kolhapur
कोल्हापूर : गणपतीची मूर्ती खाली आणताना रोप वायर तुटल्याने एकाचा मृत्यू; एक जखमी

आपल्या ६५ वर्षांच्या वृद्ध वडिलांना घेऊन मुलगा झाशी स्टेशनला जात होता. पण हे दोघंही चुकून भलत्याच प्लॅटफॉर्मवर उभे होते. ट्रेन सुटेल या भीतीने दोघांनी रुळ ओलांडून पलिकडच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी धाव घेतली. पण समोरून येणारी मालगाडी मात्र दोघांना दिसली नाही. जेव्हा लोकांनी त्यांना पाहून आरडाओरडा करायला सुरूवात केली तेव्हा दोघांच्या आपली चूक लक्षात आली. पण तोपर्यंत उशीर झाला होता तेव्हा या दोघांनी दोन रुळांच्या पोकळ भागात उताणे पडण्याचा निर्णय घेतला. ही ट्रेन निघून जाईपर्यंत समोरचे दृश्य पाहून प्रवाशांच्या अंगावर काटा उभा राहिला. हे दोघंही अपघातातून वाचले नसतील अशी भीती प्रवाशांना वाटत होती. पण आश्चर्यकारकरित्या ते दोघंही रेल्वे अपघातातून बचावले.