गेल्या काही दिवसांपासून ऑलिम्पिक आणि भारताची कामगीरी या विषयांवर जणू ट्विटर वॉर सुरु आहे. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने यावर भारताची खिल्ली उडवली, त्याचा ट्विटरवर भारतीय नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतला, त्यानंतर या टविटरवॉरमध्ये भारताची खिल्ली उडवण्यासाठी ब्रिटीश पत्रकार पिअर्स मॉर्गन देखील उतरला. भारतीय नेटीझन्सनेच त्याचाही समाचार घेतलाच पण क्रिकेटर विरेंद्र सेहवागने देखील त्याला आपल्या खास शैलीत डिवचले. त्यामुळे दुखावलेल्या पिअर्सने विरेंद्र सेहवागशी १० लाखांची पैज लावली आहे.
‘इंग्लडने वनडे वर्ल्ड कप जिंकण्यापूर्वी भारताने ऑलिम्पिकमध्ये एकतरी सुवर्ण पदक जिंकून दाखवावे अन्यथा विरेंद्र सेहवागने १० लाख रुपये दान करावे’ अशी पैज मॉर्गनेने लावली. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्याने खुलेआम सेहवागला आवाहान दिले. पण हे ट्विट टाकल्यावर विरेंद्र सेहवाग यांनी मॉर्गनची आपल्या शैलीत चांगलीच टेर खेचली. भारताने याआधी ऑलिम्पिकमध्ये सूवर्णपदक जिंकले आहे अशी थट्टा त्याने केली त्यामुळे लगेच मॉर्गने आपले ट्विट डिलिट करून नवीन ट्विट टाकले.
‘अब्जावधी लोकसंख्या असलेल्या भारतासारखा देश ऑलिम्पिकमध्ये फक्त दोन पदके घेऊन येतो आणि त्याचा आनंद उत्सवासारखा साजरा केला जातो ही लाजीरवाणी गोष्ट आहे’ असे ट्विट याआधी मॉर्गन याने केले होते. तेव्हा ‘आम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद साजरा करतो. ज्या देशात क्रिकेट खेळाचा जन्म झाला त्या देशाला एकदाही वर्ल्ड कप जिंकता आला नाही ही खरी लाजीरवाणी गोष्ट आहे’ असे उपहासात्मक ट्विट करत विरेंद्र सेहवाग यांनी मॉर्गनची बोलती बंद केली होती. त्यानंतर या दोघांमध्ये सुरु असलेले ट्विटरवॉर अख्या जगाने पाहिले.