वर्ल्ड बँक एण्टरप्राईज यांच्या सर्वेक्षणातून लाच घेणाऱ्या देशांना दोन भागात विभागले जाऊ शकते. लाच घेणाऱ्या या आकड्यांवरुन कोणत्या भागात आयकर अधिकाऱ्यांना किती टक्के कंपन्यांना लाच द्यावी लागते याचा अंदाज येतो.
१. पूर्व आशिया आणि पॅसिफिक जिथे सुमारे २९.८ टक्के कंपन्यांना लाच द्यावी लागते.
२. दक्षिण आशिया लाच घेण्यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. इथे १९.६ टक्के लाच घेण्याचे प्रमाण आहे.
३. सहारा आफ्रिकामध्ये १८.१ टक्के कंपन्यांना आयकर अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते.
४. मध्य-पूर्व भागात १७.३ टक्के कंपन्या लाच देऊन पुढे जाऊ शकल्या.
५. मध्य आशियामध्ये ९.७ टक्के कंपन्या लाच देणाऱ्या राहिल्या.
६. कॅरिबियन भागात लाच देण्याची गरज ५.९ टक्के कंपन्यांना पडली.
७. दक्षिण अमेरिकामध्ये ५.८ टक्के कंपन्या लाच दिल्याबद्दल मान्य करतात
८. मध्य युरोप आणि बाल्टिक देशात २.७ कंपन्यांना नाइलाडाने लाच द्यावी लागली आहे
९. तर पश्चिम युरोपमध्ये २.५ टक्के कंपन्यांनी लाच देण्याचा दबाव सहन केला आहे.