तुरुंगातून पळून गेलेले कैदी कधी स्वत:हून परत आलेले पाहिले आहेत का? कैदी एकदा तुरुंगातून पसार झाला की जोपर्यंत पोलीस पकडून आणत नाही तोपर्यंत ते काही परत येत नाही. पण आग्राच्या तुरुंगातून पळून गेलेला कैदी मात्र आपल्या प्रेयसीसोबत एक आठवडा घालवून पुन्हा तुरुंगात परतला आहे.

VIRAL VIDEO : या सुरक्षारक्षकाचा सुरेल आवाज ऐकलात का?

आग्र्याच्या तुरुंगात २०१४ मध्ये खूनाच्या आरोपावरुन जितेंद्र या खून्याला ठेवले होते. ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार या कैद्याने एका आठवड्याची पॅरोलवर सुट्टी मागितली होती. पण त्याच्या विनंतीकडे पोलिस अधिका-यांनी दुर्लक्ष केले. कारण त्याला सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित करायचे होते. वारंवार रजेसाठी अर्ज करूनही तो फेटाळला गेला. म्हणूनच या कैदाने तरुंगातून पळ काढला. तुरुंगातून पळ काढल्यानंतर त्याने सर्वप्रथम आपल्या प्रेयसीला फोन केला. नंतर हे दोघही ट्रेन पकडून गोव्यास पसार झाले.

या दोघांनी गोव्यात आठवडा  घालवला. आठवडा उलटल्यानंतर हा कैदी पुन्हा तुरुंगात परतला. प्रेयसीसोबत वेळ घालवून त्याने पोलिसांसमोर सर्मपण केले. त्यामुळे कैद्याच्या या अजब गजब वागण्याने  पोलिसही चक्रावून गेले आहेत. याला पाहताच पोलिसांनी त्याला पुन्हा तुरूंगात डांबले आहे. या आठवड्यात त्याच्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान तुरुंगातील पोलिसांच्या हलगर्जीपणासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.