वर्णभेदी जाहिरात प्रकाशित केल्यानंतर डव्ह कंपनीवर जाहीर माफी मागण्याची वेळ आली. या आठवड्यात डव्हने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक जाहिरात अपलोड केली होती. ही जाहिरात वर्णभेदी आहे अशी टिका मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यानंतर डव्हने सोशल मीडियावर माफी मागितली. वर्णभेदी जाहिरात केल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर डव्हविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. लोकांच्या रोषाला समोरं जावं लागल्याने डव्हनं आपली जाहिरात मागे घेतली. हे प्रकरण ताजं असताना या जाहिरातीतील कृष्णवर्णीय मॉडेलने पहिल्यांदाच आपलं मत मांडलं आहे.

Viral : कर्मचाऱ्यांची ‘ती’ सवय मोडण्यासाठी कंपनीने शोधून काढला भन्नाट उपाय

लोला असं तिचं नाव असून ती मुळची नायजेरियाची आहे. या जाहिरातीचे स्क्रीनशॉर्ट काढून ते चुकीच्या पद्धतीने व्हायरल केल्याचं तिने ‘गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. डव्ह लोशनची जाहिरात करताना लोला आपलं टिशर्ट काढते आणि तिचं लगेच श्वेतवर्णीय महिलेत रुपांतर होतं असं दाखवण्यात आलं आहे. पण लोला म्हणते ‘लोकांनी हे खूप चुकीच्या पद्धतीने घेतलं आहे. मी कृष्णवर्णीय आहे. जगप्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्य आहे. जगातील कृष्णवर्णीय मुलींचं प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मला मिळाली. काळं असणं म्हणजे कुरुप असणं होत नाही, कृष्णवर्णीय रंगाच्या मुलीलाही महत्त्व आहे हे मला दाखवून देण्याची संधी या जाहिरातीद्वारे मिळाली, त्यामुळे ही जाहिरातीत वर्णभेदी असल्याचं मला वाटत नाही. ‘ असं तिने मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

‘या जाहिरातीतून कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता, पण अनावधानाने झालेल्या चुकीची आम्ही माफी मागतो’ असं सांगत डव्हने दोन दिवसांपूर्वीच ट्विटवर माफी मागितली होती.

FIFA U17 : गोलकीपर धीरजच्या पालकांचा फुटबॉल खेळण्यास विरोध होता कारण…