रमझान ईदच्यादिवशी मागील महिन्याभरापासून केलेला रोजा मुस्लिम बांधव सोडतात. आपल्या कुटुंबियांबरोबर तसेच मित्रमंडळींसोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेत एकत्रित हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मातील तेढ दूर व्हावी यासाठी एका तरुणाने अनोखी पद्धत अवलंबली आहे. त्याने एकता आणि बंधुता यांचे अनोखे दर्शन घडवले आहे.

दिल्लीतील इंडिया गेट येथे उभे राहून अतिशय अनोख्या पद्धतीने त्याने आपला रोजा सोडणार असल्याचे त्याच्या या उपक्रमातून दिसून आले आहे. अतिफ अन्वर असे या तरुणाचे नाव असून त्याने आपल्या डोळ्यावर काळी पट्टी बांधत हातात एक बोर्ड पकडला होता.

Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!
Environmentalist Sonam Wangchuk hunger strike to demand restoration of statehood to Ladakh
लडाखला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा; पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरूच

मी महिनाभराचा रोजा हिंदू बांधवांच्या मदतीने सोडणार असल्याचे त्याने यामध्ये म्हटले आहे. मी एक मुसलमान आहे…आज माझा रोजा आहे…माझा रोजा मी हिंदू बांधवांच्या हातून सोडावा असे मला वाटते. आणि त्याच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ईदच्या ४ ते ५ दिवस आधीपासून हा मुलगा याठिकाणी आपला बोर्ड घेऊन थांबत असे. त्याच्या या आवाहनाला प्रतिसाद देत या ठिकाणाहून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी त्याला आपला उपवास सोडण्यास मदत केली. त्यामुळे या दोन धर्मांतील बंधुभाव जपण्याचा संदेशच या तरुणाने यानिमित्ताने दिला आहे.

फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत १४ लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अफलातून या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यासंबंधी केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात गाजत असल्याचे दिसते.