कथा आणि कल्पनेतील ‘ड्रॅगन’ला नेटीझन्संनी पुन्हा एकदा जागे केले आहे. चीनच्या डोंगराळ भागात ड्रॅगन भरारी घेत असतानाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर ड्रॅगनच्या अस्तित्वाबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीजण व्हिडिओतील ड्रँगन खरा असल्याचे मानत आहेत. तर काहींना अजूनही ड्रॅगनच्या अस्तित्वाबाबत शंका असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये आकाशात भरारी घेत असलेल्या ड्रँगनचे चित्रिकरण हे चीन लाओस सीमाभागातील आल्याचे बोलले जात आहे.

कथा कल्पनेतील ड्रॅगनला अपेक्स टिव्हीने जागे केले. अॅपेक्स टीव्हीने चीनमध्ये आढळलेल्या ड्रॅगनचा व्हिडिओ  हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याला अल्पावधीत लोकप्रियता मिळत असून व्हिडिओसंदर्भात चर्चा रंगत आहेत. लाखो नेटीझन्स या व्हिडिओला पसंती देताना दिसत आहे. मोबाइलच्या माध्यमातून ड्रॅगनला कैद करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने तो म्हणावा इतका स्पष्ट दिसत नसला तरी कथा आणि कल्पनेतील ड्रॅगनच्या लोकप्रियतेमुळे या व्हिडिओला पसंती मिळत आहे.

चीनी लोक आपल्याला ड्रॅगनचे वंशज समजतात. त्यामुळे चीनला ड्रॅगनचा देश म्हणून देखील ओळखले जाते. ड्रॅगनच्या कथा आणि चित्रपटांना जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. लोक ड्रॅगनसंदर्भात जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. मग यामध्ये कथेत साकरलेला ड्रॅगन असो अथवा चित्रपटाद्वारे भेटीला आलेला ड्रॅगन असो तो नेहमीच चर्चेचा विषय बनतो.