एखाद्या खेळाडूकडून कोणती गोष्ट शिकायची असेल तर ती म्हणजे ‘खिलाडूवृत्ती’ (स्पोर्टस्मनशिप). याच वृत्तीमुळे त्याचा उमदा स्वभाव लक्षात येतो. खेळात कधीही हार मानायची नाही, जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत कोणताच सामना संपलेला नसतो. समोरची परिस्थिती कितीही वाईट असली तरी शेवटपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही, ही वृत्ती प्रत्येक खेळाडूमध्ये असलीच पाहिजे आणि हाच नियम एका महिलेने शेवटपर्यंत पाळला.

अबब! ३६ अंडी, ५ लिटर दूध आणि ३ किलो मांस, पाकिस्तानी ‘हल्क’चा खुराक

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
Brazilian woman brings dead man in wheelchair to bank to sign loan
पैशासाठी काहीपण! मृत काकांना व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहचली महिला अन्….धक्कादायक घटनेचा Video Viral
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली

मूळची अटलांटाची रहिवासी असेलल्या डिव्हॉन नावाच्या नर्सने वॉशिंग्टनमध्ये झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता. पण अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्याआधीच काही दूर अंतरावर थकवा आल्याने ती कोसळली. तिला उठताही येत नव्हतं, पण लक्ष्य काही दूर अंतरावर असताना हार मानणंही तिला पटत नव्हतं. स्पर्धेतून बाद हो असा अनेकांनी तिला सल्ला दिला. पण तिच्यातली खिलाडूवृत्ती तिला स्वस्थ बसू देईना. चालता येत नसल्याने तिने गुडघ्यावर रेंगाळत शेवटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण रस्त्यावर असलेल्या दगडांमुळे तिच्या गुडघ्याला जखमा झाल्या, तिचा तो प्रयत्न तिथेच फसला. पण तरीही तिने हार मानली नाही, ती पोटावर सरपटत चालू लागली. पोटालाही जखम झाल्यानंतर कदाचित ती हार मानेल असं सगळ्यांना वाटलं, पण इतरांना खोटं ठरवतं ती चक्क लोटांगण घालून अंतिम रेषेपर्यंत पोहोचली.

Video : तंत्रज्ञानाची कमाल!; २००० टनाची इमारत आठवड्यात हलवली