”क्रिकेट ज्यांचे दैवत आहे त्यांचा असतो एकच देव,
क्रिकेटर व्हायचंय मुलाला तर पोराचं नाव सचिन ठेव
आठवणी साऱ्या सचिनच्या
आज रंगात रंगवूनी भरूया
४४ वा जन्मदिवस असा हा रांगोळीतून साजरा करूया..”
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगभरात चाहते आहेत, पण या चाहत्यांमध्ये काही चाहते हे इतरांपेक्षाही खूप वेगळे आहेत अक्षरश: ‘सचिन’ या एका नावाने ते एवढे झपाटलेले आहेत की त्यांना नुसते ‘चाहते’ किंवा सचिनचा ‘फॅन’ म्हटलं तर चुकीचे ठरेल. सचिनच्या अशाच एका वेड्या चाहत्यांपैकी एक आहे तो अभिषेक आणि त्याचा मित्र संदीप. आज सचिनचा ४४ वा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने त्यांनी खास क्रिकेटच्या देवासाठी परळच्या आर.एम.भट्ट शाळेच्या पटांगणात भव्य रांगोळी साकारली आहे. या रांगोळीवर क्रिकेटच्या देवासाठी छानशी कविता रेखाटून त्यांनी सचिनला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनचा ४४ वा वाढदिवस आणि क्रिकेटमधली त्याची २४ वर्षांची कारकीर्द अशा संकल्पनेतून अभिषेक साटम आणि संदिप बोबडे या दोन मित्रांनी ४४ फूट लांब आणि २४ फूट रुंद अशी भव्य रांगोळी साकारली आहे. दोन दिवस या मित्रांनी मेहनत करून ही भव्य रांगोळी रेखाटली आहे, विशेष म्हणजे सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांना या शाळेच्या पटांगणात आजपासून २६ एप्रिलपर्यंत ही रांगोळी पाहता येणार आहे. अभिषेक हा तर लहानपणापासून सचिनचा ‘जबरा फॅन.’ त्याची छोटीशी खोली सचिनच्या फोटोंनी भरलेली. वयाच्या सहाव्या वर्षांपासूनच सचिनचा एवढा प्रभाव अभिषेकवर होता. त्याने तेव्हापासूनच सचिनशी निगडीत एकूण एक गोष्टींचा संग्रह करायला सुरूवात केली.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

या संग्रहात १५ वर्षांपासूनच्या वर्तमानपत्रातील लेख, ३० हून अधिक पुस्तकं, २०० हून जास्त साप्ताहिकं, मासिकं आहेत. यात तीस हजारांहून अधिक छायाचित्रं, पंधरा हजारांहून अधिक लेख आहेत. सचिनचे फोटो असणारे बॉलपेन, कोल्डड्रिंक्सचे टिन अशा वस्तूही या संग्रहात आहेत आणि दिवसेंदिवस अभिषेकचा हा संग्रह वाढतच जात आहे. सचिनची स्वाक्षरी असणारी एक सोन्याच्या मुलाम्याची बॅटही अभिषेककडे आहे.  सचिनला प्रत्यक्षात भेटण्याची अभिषेकला खूपच इच्छा आहे, पण आतापर्यंत क्रिकेटच्या देवाला साक्षात भेटण्याची त्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही,  भविष्यात सचिनला कधीतरी नक्कीच भेटू आणि हिच आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट असेल असंही अभिषेक सांगतो.