दिवाळ सण आला की कर्मचा-यांना उत्सुकता लागते ती बोनसची. दिवाळी सणांत कर्मचा-यांना बोनस सोबत भेटवस्तूही दिल्या जातात. पण सूरतमधले प्रसिद्ध हिराव्यापारी सावजी मात्र आपल्या कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस म्हणून सदनिका किंवा गाड्या देतात. दिवाळी आली की सवजी ढोलकिया चर्चेत येतात. यंदा दिवाळी भेट म्हणून त्यांनी आपल्या १७६१ कर्मचा-यांना गाड्या, सदनिका आणि दागिने भेट म्हणून दिल्या आहेत. या १७६१ कर्मचा-यांपैकी १२६० कर्मचा-यांना गाड्या, ४०० जणांना सदनिका आणि ५६ कर्मचा-यांना दागिने देण्याची घोषणा त्यांची मंगळवारी केल्याची चर्चा रंगली आहे. ‘हरे कृष्ण एक्सपोर्टचे’ चेअरमन असलेले सावजी यांनी २०१४ मध्ये देखील आपल्या कर्मचा-यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या, सदनिका आणि दागिन्यांचे वाटप केले होते. २०१४ मध्ये सावजी यांनी १३०० कर्मचा-यांना गाड्या, दागिने देऊन खूश केले होते.  स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार ज्या कर्मचा-यांना ही भेट मिळणार आहे त्यांचे पगार हे दरमहा दहा ते ६० हजारांच्या आसपास आहे. ज्यांना याआधी अशा प्रकारच्या भेटी मिळाल्या आहेत त्यांचे नाव यंदा यादीतून वगळण्यात आले आहे.

कोण आहे सावजी ढोलकिया
‘हरे कृष्ण एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे सावजी संस्थापक आहे. त्यांच्या कंपनीतून जवळपास ५० देशांमध्ये हि-यांची निर्यात जाते. हिरा व्यापारांमध्ये ते ‘सावजी काका’ या नावाने प्रसिद्ध आहेत. गुजरातच्या दुधारा गावातल्या शेतकरी कुटुंबात सावाजींचा जन्म झाला. वयाच्या १३ व्या वर्षांत शाळा सोडल्यानंतर त्यांनी आपल्या काकाला हिरा व्यवसायात मदत करायला सुरूवात केली.