आपण बऱ्यापैकी फेसबुकवर सक्रीय असतो. आता फेसबुक वापरणाऱ्यांना एक गोष्ट कदाचित नक्की माहित असेल की कोणतीही व्यक्ती तुमच्या फेसबुक प्रोफाईल पिक्चरची सहज चोरी करू शकतो. अर्थात प्रोफाईल पिक्चरची सेटिंग ही पब्लिक असल्याने कोणीतीही व्यक्ती तो फोटो सहज पाहू शकतो किंवा तुमच्या नकळत तो डाऊनलोडही केला जाऊ शकतो. तुमच्या फेसबुक प्रोफाईल फोटोचा गैरवापर करू शकतो. तेव्हा तुमचा फोटो अधिक सुरक्षित करण्यासाठी फेसबुकने नवे फिचर आणलं आहे. खास प्रोफाईल फोटोसाठी फेसबुकने प्रोटेक्शन गार्ड आणलं आहे. अर्थात हे फक्त भारतीय युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.

वाचा : शिक्षकांशी बंडखोरी, मुलं चक्क पँटऐवजी स्कर्ट घालून शाळेत पोहोचली

फेसबुकच्या नव्या अपडेटनुसार अनेक अँड्राईड मोबाईलमध्ये हे फिचर्स अपडेटही झाले असेल. या सेटिंगवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईलवर निळ्या रंगाची फ्रेम येईल. ही फ्रेम आली की तुमचा प्रोफाईल पिक्चर सुरक्षित झाला असं समजावं. त्यामुळे तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेले किंवा नसलेली कोणतीही व्यक्ती तुमचा फोटो तुमच्या नकळत डाऊनलोड किंवा शेअर करू शकत नाही. तेव्हा या फिचरच्या मदतीने कोणत्याही युजर्सच्या प्रोफाईचा गैरवापर होणं टळेल. भारतीय महिला आपले फोटो फेसबुकवर शेअर करायला घाबरतात आपल्या फोटोचा कोणी गैरवापर करेल अशी भीती त्यांना असते, म्हणूनच फेसबुकने हे नवे फिचर आणले आहे. अर्थात यामुळे थेट अकाऊंटवरून फोटो चोरण्याचा धोका कमी झाला असला तरी अँड्राईड युजर्स स्क्रिनशॉट काढून तुमच्या फोटोचा गैरवापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही फेसबुकने स्पष्ट केलंय.

Viral Video : अपघात पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल