पॅरिसमधल्या सीन नदीच्या कठड्यावर पहाटे नागरिकांना एक बुचकाळयात टाकणारं दृश्य दिसलं. नदीच्या कठड्यावर एक अजस्त्र व्हेलचा मृतदेह पडून होता. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सगळ्यांचा एकच गोंधळ उडला. सीन नदीमधून एखादा विशाल सागरी जीव शहारात कसा येऊ शकतो याचं उत्तरच अनेकांना सापडत नव्हंत. बरं व्हेल आली तरी एवढा अजस्त्र जीव कठड्यापर्यंत कसा पोहोचेल हे अनेकांना कळतच नव्हतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून अनेकांना निष्कर्षही लावता येईना.

मंदिरातील पूजेसाठी कॅनडाचे पंतप्रधान ‘देसी लूक’मध्ये

जेव्हा लोक फोटो पाहून प्रत्यक्षात सीन नदीच्या काठावर पोहोचले तेव्हा कुठे त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं. पर्यटकांचं सर्वात आवडतं प्रेक्षणीय स्थळ असलेल्या सीनच्या काठावर व्हेलची कलाकृती उभारण्यात आली होती. ही कलाकृती इतकी सजीव वाटत होती की अनेकांचा ते पाहून पुरता गोंधळ उडाला होता. कॅप्टन बुमर कलेक्टीव्हच्या मदतीनं ही कलाकृती इथे उभारण्यात आलीय. ही कलाकृती इतकी सजीव वाटतेय की अनेकांनी तिल्या खऱ्या व्हेलसारखा याचा वासही येतो असंही सांगितलं. जगभरातील व्हेलची घटत चाललेली संख्या, प्रदूषण आणि वाढत्या पर्यावरण बदलाचा होणारा परिणाम याविषयी जनजागृती व्हावी यासाठी ही कलाकृती इथे उभारण्यात आलीय. येत्या रविवारपर्यंत ही कलाकृती येथे पाहायला मिळणार आहे.