श्रीलंकेतील कोलंबो येथील समुद्रात वाहत गेलेल्या दोन हत्तींना बाहेर काढण्याचे सैन्याचे प्रयत्नाने अखेर यश आलं. कमी वयाचे हे हत्ती वाहत समुद्रात आतमध्ये गेले. श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून हे हत्ती जवळपास एक किलोमीटरहून जास्त अंतर आत गेले होते. त्यांना पाण्याबाहेर काढताना सैन्याने शर्थीचे प्रयत्न केले.

समुद्राच्या किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या श्रीलंकेच्या नौसेनेला हे हत्ती पाण्यात असल्याचे दिसले. त्यानंतर नौदलाने त्यांना बाहेर आणण्यासाठी काही तयारी केली आणि त्यांना यशस्वीपणे बाहेर काढले. दोन आठवड्यांपूर्वी अशाच प्रकारची एक घटना घडली होती. यावेळी एक हत्ती समुद्रात जवळपास आठ किलोमीटर इतके अंतर आत गेला होता.

याबाबत नौदलातील अधिकारी म्हणाले, श्रीलंकेमध्ये उथळ पाण्याची खारी सरोवरे आहेत. त्यातून बाहेर पडता न आल्याने हे हत्ती समुद्रकिनाऱ्यावर येतात. मात्र अशाप्रकारे अनेक प्राणी समुद्रातील पाण्यात सापडतात त्यामुळे हत्ती हा एकटाच अशाप्रकारचा प्राणी आहे असे म्हणता येणार नाही.