‘नजर हटी, दुर्घटना घटी’ रस्त्याने प्रवास करताना हे फलक आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. किंचितसं दुर्लक्ष किती महागात पडू शकतं हे दाखवणारा व्हिडिओ ब्रिटनच्या रेल्वे पोलिसांनी जारी केला आहे. रेल्वे रुळावरून वेगात मालगाडी धावत असताना फलाटवरील बाबागाडी घरंगळत मालगाडीवर आदळली आणि क्षणार्धात बाबागाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. सुदैवाने यात लहान मुलं नसल्यानं अप्रिय घटना घडली नाही. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ जनजागृती करण्यासाठी व्हायरल करण्यात आला. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी पालक मुलांना बाबागाडीत बसवतात आणि बेपर्वाईने वागतात. बाबागाडीला किंचितसा धक्का बसला की ती घरंगळत जाऊन मुलाला दुखापत होण्याची अनेक उदाहरणं आहेत. पण तरीही वारंवार चुका होतात.

Viral Video : अशी गंम्मत केली तर या उंच काचेच्या पुलावर कोण बरं जाईल?

म्हणून ब्रिटन पोलिसांनी न्यूनेटॉन स्टेशनवरच्या व्हिडिओचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहेत. स्टेशनवरून वेगात मालगाडी जात असताना बाबागाडी तिला आदळली. मालगाडीची धडक इतक्या वेगात बसली की बाबागाडीचे अक्षरश: तुकडे झाले, जर त्यात एखादं लहान मुलं असतं तर दुर्दैवाने भयंकर अपघात घडला असता. गाडी घरंगळत जाण्याआधीच लहान मुलाच्या आत्याने त्याला उचलून घेतलं होतं. तर बाबागाडी त्याच्या दुसऱ्या आत्याच्या हातात होती. आपलं दुर्लक्ष झालं आणि गाडी हातातून सुटून ती मालगाडीला आदळल्याचं रेल्वे पोलिसांना तिने सांगितलं.

ही घटना महिन्याभरापूर्वीची आहे, पण कोणत्याही पालकानं यापुढे असं बेजबाबदार वागू नये म्हणून स्टेशनवरचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे.

लष्करी अधिकारी व्हायचं स्वप्न भंगलं अन् ‘ती’ टॅक्सी चालक झाली