खग्रास सूर्यग्रहाण पाहण्याचा मनमुराद आनंद सोमवारी २१ ऑगस्टला अनेकांनी लुटला. प्रशांत महासागर, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात, यूरोपच्या पश्चिम आणि उत्तर भागात, पूर्व आशिया आणि वायव्य अफ्रिका या भागांमध्ये खग्रास सूर्यग्रहण दिसले. तेव्हा जगभरातील खगोलप्रेमी ग्रहण पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते.

(छाया सौजन्य : AP)

तब्बल ९९ वर्षांनी अमेरिकेत खग्रास सूर्यग्रहण दिसले.

Inspiring story of Mumbai's varun sawant who is autistic chef and ultra marathoner
गोष्ट असामान्यांची Video: ऑटिस्टक शेफ आणि अल्ट्रा मॅरेथॅानर वरुण सावंतचा प्रेरणादायी प्रवास
24 Year Old Women Pee Turned Black Like Cola Rush To ICU Are You Overdoing Perfect Ratio For Work and Exercise by dr Mehta
तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र
Opportunities for the unemployed Recruitment for more than 20 thousand vacancies
बेरोजगारांना संधी! २० हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती!
According to the credit rating agency the highest growth will be in the sale of svu eco news
‘एसयूव्ही’च्या विक्रीतच सर्वाधिक वाढ! पुढील आर्थिक वर्षासाठी ‘क्रिसिल’चे प्रवासी वाहन विक्रीचे अनुमान
(छाया सौजन्य : AP)

अमेरिकतेल्या १४ राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळात हे ग्रहण दिसले.

(छाया सौजन्य : AP)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांनी देखील व्हाईट हाऊसच्या बाहेर येऊन निसर्गातील एक असामान्य घटना पाहण्याचा आनंद लुटला.

(छाया सौजन्य : AP)

सकाळी १०. वाजून १५ मिनिटांनी ऑरेगनमध्ये सूर्यग्रहण दिसले. दुपारी २. ५० मिनिटांनी हे ग्रहण संपले. सूर्य पूर्णपणे झाकोळला गेल्यानं भरदुपारी अंधार झाला होता.

(छाया सौजन्य : AP)

ज्या लोकांना ग्रहण पाहता येणं शक्य नव्हतं अशासाठी नासानं लाइव्ह टेलिकास्टही केलं होतं. अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांनी या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहिर केली होती.

(छाया सौजन्य : AP)