आयसिस या क्रूर दहशतवादी संघटनेच्या अत्याचाराच्या काहाणीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटनेत आयसिसचा समावेश आहे. त्यांच्या दहशतीमुळे अनेक सिरियन नागरिक मरणयातना भोगत आहेत, तर काही जण इतर देशांमध्ये आश्रयाला गेले आहेत. नुकतीच सिरिअन डेमोक्रेटिक फोर्स आणि पीपल्स प्रोटेक्शन युनिटच्या सैन्याने संयुक्त कारवाई करत आयसिसच्या तावडीत असलेल्या राक्का भागातील नागरिकांची सुटका केली.

Viral : अहो गर्लफ्रेंड नव्हे, ‘ती’ माझी आई आहे!

गेल्या कित्येक महिन्यांपासून दहशतवादांच्या अत्याचाराला घाबरून जीव मुठीत घेऊन इथले नागरिक जगत होते. आपलं आयुष्यचं जणू संपलं आहे, मृत्यू कधीही आपल्याला गाठू शकतो, ही भीती घेऊन इथले लोक जगत होते. पण सुदैवाने सैन्याने आयसियच्या तावडीतून नागरिकांची सुटका झाली. यात महिलांचे प्रमाण जास्त होते. शरिया कायदा, दहशवाद्यांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला तोंड देत या महिला आपला आलेला दिवस ढकलत होत्या. सैन्याने सुटका केल्यानंतर या महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सुटका झाल्यानंतर महिलांनी नाचून आणि अल्लाहचे आभार मानून आपला आनंद व्यक्त केला. काही महिलांना तर अश्रू अनावर झाले. आयसिसच्या नरकातून सुटका केलेल्या महिला सैनिकांना मिठ्या मारून सिरीयन महिलांनी त्यांचे आभार मानले. हे आनंदाचे क्षण एक पत्रकाराने कॅमेरात कैद केले असून ते फोटो सध्या व्हायरल होत आहे.