बाहेर इतकी उष्णता आहे की माझा उकडून बटाटा झालाय असं आपण कधीतरी उन्हाळ्याच्या दिवसात सहज म्हणून जातो. पण अशाच उन्हात अंड्याचं ऑम्लेट होण्याइतकी उष्णता कधी पाहिलीये? आता गॅसइतकी उष्णता उन्हात कशी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हो, अरब देशांतील दुबईमध्ये एका व्यक्तीने थेट जमिनीवर तवा ठेऊन ऑम्लेट करून दाखवलं.

या देशातील ‘फेटाफिट’ या एका फूड चॅनलने आपल्या शोमध्ये ही गोष्ट दाखविली आहे. या शोमधील शेफ आपल्या किचनमधून बाहेर येऊन फूटपाथवर तवा ठेवतो. त्यामध्ये ऑम्लेट करण्यासाठी तेल घातल्यावर तो त्यात फोडलेले अंडे घालतो आणि विशेष म्हणजे अवघ्या १० मिनिंटात त्याच ऑम्लेट तयारही होतं .
आता ऑम्लेट होते म्हणजे याठिकाणचे तापमान नेमके किती असेल असा प्रश्नही तुम्हाला पडेल. तर हे तापमान जवळपास ५० डिग्री सेल्सियस इतके असल्याने यामध्ये ऑम्लेट अगदी सहज होऊ शकते. आपण घरात गॅसवर ज्याप्रमाणे ऑम्लेट करतो त्याचप्रमाणे दुबईमध्ये तुम्ही घराबाहेरही ऑम्लेट बनवू शकता हेच जणू त्यांना दाखून दिलंय.

https://www.instagram.com/p/BW7jBVTBncD/

या अनोख्या अशा प्रकारामुळे तुमच्या घरातील गॅस चुकून संपला किंवा आणखी काही अडचण आलीच तर चिंता करायचे कारण नाही. अशाप्रकारे तुम्ही अतिशय नैसर्गिक पद्धतीने जेवण बनवू शकता तेही गॅस किंवा ओव्हन आणि चुलीशिवाय. हा व्हिडिओ संबंधित चॅनलने इन्स्टाग्रामवर टाकला असून त्याला नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या २४ तासात ३० हजार जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. असाच प्रकार याआधी ओडिसामध्येही घडला होता. तिथेही जास्त उष्णता असल्याने एका व्यक्तीने अशाचप्रकारे आपल्या घराबाहेरील जमिनीवर ऑम्लेट बनविले होते.