प्रियकराला स्पर्श केल्यामुळे प्रेयसीला भर चौकात चाबकाचे फटके मारण्यात आले. भर रस्त्यात हतबलपणे चाबकाचा मार सहन करणा-या या मुलीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर या कठोर शिक्षेविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला जात आहे.
इंडोनेशियामध्ये सर्वाधिक मुस्लिम समाजाचे लोक राहतात. येथल्या बंदा आचे या प्रातांत शरिया कायदा लागू आहे. २००१ पासून या प्रातांत शरिया कायदा लागू करण्यात आला आहे, त्यामुळे मद्यपान, जुगार खेळणे, अनैसर्गिक संबंध यासाठी चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात येते. सोमवारी लग्नाआधी शारिरिक संबंध ठेवले या आरोपातून ६ जोडप्यांना भर चौकात चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. त्यात २० ते २५ वयोगटातील तरुणी होत्या. यातल्या एका मुलीला तर प्रियकराच्या अधिक जवळ गेल्याने चाबकाचे फटके मारण्यात आले.
ही शिक्षा पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने लोक चौकात जमले होते आणि अत्यंत निदर्यपणे भर चौकात मुलींना फटके मारले जात होते पण दुर्दैवाची बाब म्हणजे जमलेले सगळचे फटके मारणा-याला आणखी जोरात फटके मारण्यासाठी प्रवृत्त करत होते. लोक जसे ओरडत होते तसे फटके मारणा-याचा जोर आणखी वाढत होता. लोक या शिक्षेची मजा घेत होते पण या मुली मात्र मुक गिळून मार सहन करत होत्या. काही जण तर मोबाईल आणि कॅमेरामध्ये हा सारा प्रकार कैद करण्यात गुंग होते. हे फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर नेटीझन्सकडून मात्र याचा विरोध केला जात आहे. अनेक आखाती देशांत शरिया कायद्याचे उल्लंघन केल्यास भर चौकात चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात येते.