हॉटेल, रेल्वे स्टेशन किंवा अन्य कुठेही तुम्ही गेलात की पाण्याच्या बाटलीसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतात. असा अनुभव अनेकांना येतो. अशा ठिकाणी पाण्याची बाटली विकत घेतली की दोन रुपयांपासून ते चक्क दुप्पट पैसे सुद्धा तुम्ही आम्ही मोजले असतील. जास्त पैसे देणे तुमच्या आमच्यासाठी सवयीचेच झाले आहे म्हणा. हॉटेलमध्ये गेले की पाण्याच्या बाटलीवर जास्त पैसे आकारणारच हे ठरलेले आहे अशी समजूत तुम्ही स्वत:ची घालत असाल तर ती पूर्णपणे चुकीचे आहे.

वाचा : रोजगार हिसकावून घेणा-या रोबोटवर टॅक्स लावला पाहिजे- बिल गेट्स

वाचा : हे कुटुंब खरोखर राहत होतं ‘काळाच्या ४० वर्ष मागे’

याच कारणावरून हैदराबादमधल्या एका ग्राहकाने हॉटेलला कोर्टात खेचले. शेवटी या ग्राहकाचा विजय झाला आणि कोर्टाने या हॉटेलला जास्त पैसे आकारल्या बद्दल २० हजारांचा दंड ठोठावला आहे. आंध्रप्रदेशमध्ये राहणारे कोडाईन हे शर्वी हॉटेलमध्ये गेले होते. हैदराबादमधल्या बंजारा हिल्स परिसरात हे हॉटेल आहे. या हॉटेलने कोडाईन यांच्याकडून पाण्याच्या बाटलीचे दुप्पट पैसे घेतले. बाटलीची मूळ किंमत २० रुपये होती पण हॉटेलने मात्र त्यांच्याकडून चाळीस रुपये घेतले. हे प्रकरण पुढे कोर्टात गेले. कोर्टाने या हॉटेलला २० हजारांचा दंड ठोठावला असल्याचे द हिंदूने म्हटले आहे.